Thursday , December 8 2022
Breaking News

युक्रेनमध्ये डॉक्टर होण्यासाठी का जातात विद्यार्थी? काय आहे तिथल्या MBBS चं वैशिष्ट्य? वाचा सविस्तर…

सुराज्य न्युज / नाशिक प्रतिनिधी

नाशिक :- सर्वात स्वस्त MBBS
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी MBBS शिकण्यासाठी जातात, याचं प्रमुख कारण म्हणजे शुल्क. तेथील खासगी कॉलेजची एमबीबीएसची फीस भारताच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. भारतात एखाद्या खासगी कॉलेजमध्ये MBBS करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. अमेरिकेत 5 कोटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडातदेखील हा खर्च चार कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र युक्रेनमध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये MBBS ची संपूर्ण डिग्री 5 लाख रुपयांत मिळून जाते. त्यामुळे आपल्या देशातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी जातात.
MBBS च्या जागांचा तुटवडा
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी MBBS ला जाण्यामागील आणखी एक मोठं कारण म्हणजे भारतातील MBBS च्या जागांचा तुटवडा. भारतात अजूनही दरवर्षी फक्त 88 हजार MBBS च्या जागा उपलब्ध आहेत. दरवर्षी जवळपास 8 लाखांहून अधिक विद्यार्थी दोन वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर डॉक्टरकीची प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी 88 हजारांनाच MBBS चं शिक्षण घेण्याची संधी मिळते. म्हणजेच 7 लाख विद्यार्थ्यांचं स्वप्न अर्धवट राहतं. यापैकीच काही मुलं मग युक्रेनसारख्या देशाची वाट धरतात.
भारतात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) पास झाल्यानंतर नोकरी कींवा व्यवसाय करु शकतात.
प्रवेशासाठी काय आहेत अटी?
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. यासाठी पीसीबी विषयासह 12 वीत 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: