Thursday , December 8 2022
Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- निफाड तालुक्यातील जळगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या जळगाव येथे विलास नागरे हे गावाजवळ मुख्य रस्त्यालगत शेतात राहतात, वस्ती करून त्यांच्या घराजवळ गायी व वासरू बांधलेले होते. शनिवारी रात्री ११. ३० च्या अचानक बिबट्याने सुमारास वासरावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर गायीने हंबरडा फोडला त्या आवाजाने नागरे कुटुंब धावतच घराबाहेर आले. वासराला बिबट्या ओढत नेत चालला तेव्हा होता. नागरे कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या वासराला तेथेच “टाकून तातडीने पसार झाला. या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले आहे. ही घटना घडली तेव्हा परिसरात वीजपुरवठा नव्हता, पूर्ण अंधार होता. या अंधारात बॅटरीच्या प्रकाशात नागरे कुटुंबाला बिबट्याचा मागोवा घ्यावा लागला. दरम्यान, सध्या जास्त वेळ लागू केलेले भारनियमन कमी करण्याची मागणी जळगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. ही घटना नागरे यांनी वन विभागाला कळवली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरे यांच्या शेतात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगाव येथे गावाजवळ बिबट्याने हा हल्ला केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. जळगाव येथे बिबट्याचे वास्तव्य असून या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: