Thursday , December 8 2022
Breaking News

पंचायत विस्तार अधिकाऱ्याचे गैरप्रकार करणाऱ्यांना अभय

जरुरी/विशेष सभेला ४ ग्रामसेवकाची नेमणूक

गट ग्रामपंचायत रामपुरी येथील प्रकार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा :-लाखनी तालुक्यातील रामपुरी ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेतील गैर प्रकारामुळे प्रकाशझोतात आली आहे. पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभर होत नाही तोच विशेष दुरुस्तीसाठी २९ जून रोजी जरुरी/विशेष सभा घेण्यात आली. त्याकरिता विस्तार अधिकारी पंचायत डी. ए. लंजे यांनी नियमित ग्रामसेवकासह इतर ३ ग्रामसेवकांना भ्रमणध्वनी द्वारे आदेश देऊन विशेष सभे करिता नेमणूक केली. यावरून विस्तार अधिकारी पंचायत गैरप्रकार करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकास अभय देत असल्याचे दिसून येते. विशेष सभेसाठी ४ ग्रामसेवक ही तालुक्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
७ सदस्यीय गट ग्रामपंचायत रामपुरी चे कार्यक्षेत्रात रामपुरी, रामपुरी/टोली व नांन्होरी ह्या वस्त्यांचा समावेश होतो. रामपुरी व रामपुरी/टोली येथे पाणी पुरवठ्याची पर्याप्त साधने असताना २०१७-१८ ह्या आर्थिक वर्षात ४७ लाख ४७ हजार रुपये अंदाजपत्रकिय रकमेची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मुदतीत बांधकाम पूर्ण झाले नसल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर काम पूर्णत्वास आले. पण चाचणीचे(टेस्टिंग) वेळी सदोष पाइपलाइन मुळे जलकुंभात पाणी पोचलेच नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू झाली नाही. तरीही सरपंच व ग्रामसेवकाचे स्वाक्षरीने सुरळीत पाणी पुरवठा सुरू असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला पत्र देऊन कंत्राटदारास अंतिम देयके देण्यास सरपंच व ग्रामसेवकाने मदत केली.
पाणी पुरवठा योजनेचा जलस्त्रोत जुन्या सरकारी विहिरीतून आहे. तसेच पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम वर्षभरापूर्वीच झाले असताना विशेष दुरुस्ती ची आवश्यकता नसल्याचे उपसरपंच रत्नप्रभा मधुकर देशमुख यांचे म्हणणे आहे. तरीही पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक व सरपंचाचे संगनमताने आपल्या चुकिवर पांघरून घालण्यासाठी पाणी टंचाई अंतर्गत नळ योजना विशेष दुरुस्ती सन २०२१-२२ चे निविदा मंजूर करून काम करण्यास मजूर देण्याबाबद २९ जून रोजी जरुरी/विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सरपंचाचे स्वाक्षरीने नोटीस काढण्यात आले. त्यात उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचे नावे नोटीस काढणे आवश्यक असताना काढले गेले नाही. तर सभेची वेळ १२:३० आणि २:३० अशी ठेवण्यात आल्याचे २ वेगवेगळे नोटीस काढण्यात आले. त्यामुळे ही विशेष/जरुरी सभा कायदेशीर आहे काय ? असा सभ्रम निर्माण होत असला तरी या सभेस नियमित ग्रामसेवकांशिवाय मिरेगाव चे ग्रामसेवक भोतमांगे, घोडेझरी चे ग्रामसेवक लंजे आणि विहीरगाव चे ग्रामसेवक गायधने यांना विस्तार अधिकारी पंचायत डी. ए. लंजे यांनी भ्रमणध्वनी वरून आदेश देऊन रामपुरी च्या विशेष सभेत जाण्याचे फर्मान सोडल्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकास या विस्तार अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याच्या गावात चर्चा होत आहेत.

प्रतिक्रिया/स्टेटमेंट

विस्तार अधिकारी पंचायत लंजे साहेब यांचे भ्रमणध्वनी वरील आदेशामुळे ग्रामपंचायत रामपुरी येथे घेण्यात आलेल्या विशेष सभेला उपस्थीत झालो.
डिरिश भोतमांगे ग्रामसेवक ग्रा. प. मिरेगाव*

प्रतिक्रिया/स्टेटमेंट

रामपुरी येथील सरपंचाने बीडीओ साहेबांना विनंती केल्याने नियमित ग्रामसेवकांच्या मदतीला इतर ग्रामसेवक पाठविण्यात आल्याची भ्रमणध्वनी वरून सूचना केली.
डी. ए. लंजे विस्तार अधिकारी(पंचायत) प. स. लाखनी

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: