Thursday , December 8 2022
Breaking News

वायगाव येथील पीर बाबा यात्रा उत्सव संपन्न

सुराज्य न्यूज / हितेंद्र दुसाने

वायगाव:-बागलाण तालुक्यातील वायगाव येथील पीर बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी प्रथम हनुमान मंदिराजवळ श्रीफळ फोडून गावातून पीरबाबा ध्वज काठी मिरवणूक काढून पीर बाबा जवळ नेऊन ध्वज लावण्यात आला. अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच रात्री मा.शिवाभाऊ सांगवीकर सह सौ. रेखाबाई धुळेकर यांचा कल्याणाकारी लोकनाट्य तमाशा साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वायगाव येथे यात्रा उत्सव झाली नव्हती परंतु यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी संपन्न झाली. तसेच दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती दंगलीमध्ये गावातील व बाहेर गावाहून आलेले लहान – मोठे कुस्तीपटू , पैलवानांनी सहभाग घेतला होता. जिंकलेल्या कुस्तीपटुला भांडे व रोख रक्कम स्वरूपात बक्षीस ठेवण्यात आले.

 

वायगांव कुस्ती दंगल व लोकनाट्य तमाशा

लिंक

१) https://youtu.be/Wm7NSXlryfk

 

२) https://youtu.be/b95W_6V0EBs

 

गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यात्रा पंच कमिटीचे सदस्य आदी. यांनी परिश्रम घेऊन यात्रा सुरळीत पार पडली. यावेळी यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये , म्हणून नामपूर औट पोस्ट पोलिस स्टेशन परिक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- श्री नाना पाटील , पोलीस हवालदार श्री राजेंद्र सोनवणे, श्री शिवाजी गुंजाळ, पोलीस नाईक श्री शरद बागल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: