Thursday , December 8 2022
Breaking News

पाणीपुरवठा मंत्री स्वतःच्या गावात पाणी देवू शकत नाही ; राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर महाजन यांची टीका

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव सुराज्य न्यूज महाराष्ट्र

धरणगाव : (११ नोव्हेंबर २०२२) धरणगाव मतदार संघातले आमदार गुलाबराव पाटील हे दोन पंचवार्षिक पासून जिल्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छ्ता मंत्री असूनही ते आपल्या स्वतःच्या धरणगाव शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. याचे उत्तर आगामी काळात त्यांना धरणगावकरांना द्यावे लागेल, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांना लगावला.

पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, तालुकाध्यक्ष धनराज माळी, शहराध्यक्ष निलेश चौधरी, मोहन पाटील, अरविंद देवरे, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, ॲड. सागर वाजपेयी, भूपेंद्र पाटील, सुमित मराठे, जितेंद्र महाजन आदी उपस्थित होते.

धरणगाव शहराला २० ते २५ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे तेही अस्वच्छ असल्याने शहरातील जनता स्थानिक आमदार व न.पा.प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कमालीचे नाराज झाले आहेत. पुढे  ज्ञानेश्वर महाजन म्हणाले रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, किमान १५ दिवसात पाटाचे पाणी सोडावे, धरणगाव डॉक्टरांची ३ पोस्ट आहेत, परंतू सद्यस्थितीत ग्रामीण रूग्णालयात फक्त एकच डॉक्टर आहेत. म्हणून उर्वरित दोन डॉक्टरांची नियुक्ती करावी. व ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ नियुक्ती करावी, त्याचप्रमाणे धरणगाव येथील स्थानिक पत्रकार भगीरथ माळी यांना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थकाने धमकी दिल्याप्रकरणी त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच धरणगाव उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात आमचाही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी म्हणाले की, ग्रामीण भागात मंत्री गुलाबराव पाटील यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे. विशेष करुन विवरे, भवरखेडे परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. पाटाची दुरुस्ती व साफसफाई झालेली नाही. ते लवकर दुरुस्त करणे गरजेचे आहे, असे देखील या वेळी धनराज माळी यांनी सांगितले.

पत्रकारांना धमकी देणाऱ्याच्या निषेध

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश चौधरी म्हणाले की, पाणी पुरवठा तथा स्वच्छ्ता मंत्री गुलाबराव पाटील हे महाराष्ट्रात मोठ-मोठी भाषणे करतात. व जळगाव ग्रामीण – धरणगाव मतदार संघात गेल्या चार पंचवार्षिक पासून पाणी या विषयावर राजकारण करून निवडून देखील आले आहेत. धरणगावातील जनतेला पिण्याचे पाणी पुरवू शकत नाहीत, याचे उत्तर त्यांना धरणगावकरांना द्यावे लागेल. त्याचप्रमाणे मंत्री पाटील यांच्या समर्थकांनी धरणगावातील पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: