Thursday , December 8 2022
Breaking News

विरगाव येथे बिबट्याने शेळीच्या गोठ्यात शिरून आठ शेळ्या केल्या फस्त…

सूराज्य न्यूज / एकनाथ अहिरे

विरगाव :- बागलाण तालुक्यातील विरगाव येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळींच्या गोठ्यात शिरून त्यांच्या वर हल्ला करुन ८ शेळ्या फस्त केल्यात तर एक शेळी जखमी झाली आहे. बिबट्याने थेट गावात प्रवेश केल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विरगांव येथील धोंडू शंकर सोनवणे यांच्या शेळींच्या वाड्यावर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला चढवत ८ शेळ्यांना ठार केले. तर एका शेळीला गंभीर जखमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. यामुळे सोनवणे यांना ७० ते ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घडलेल्या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पि.बि.खैरणार यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी वनरक्षक एम.के.बोडके, वनपाल पि.एस.पवार घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला.
यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांस मदत मिळवून द्यावी. अशी मागणी करण्यात आली. तर वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. करंजाडी खोऱ्यात उसाचे क्षेत्र अधिक होते. बिबट्यांचे वास्तव्य उसाच्या शेतीमध्येच राहात होते. उस तोडणी सुरू झाल्यामुळे त्याचे वास्तव्य धोक्यात आल्याने ते मानवी वस्तींकडे चाल करू लागले आहेत. गावात बिबट्या शिरल्यामुळे विरगांव व परिसरातील गावे दडपणाखाली आली आहेत.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: