Thursday , December 8 2022
Breaking News

वेरूळ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले गढी शासकीय व शहाजीराजे गढी स्मारक समिती आयोजित कार्यक्रम संपन्न

सुराज्य न्युज/ प्रकाश शेळके

पूर्ण विश्वाला प्रेरणादायी असलेल्या कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले कुळाचे मूळ गाव म्हणजे वेरूळ याच ठिकाणी भोसले घराण्याच्या पराक्रमी व कर्तुत्ववान वास्तव्याने पुनीत झालेली भोसले कुटुंबीयांची गढी आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा 18 मार्च 1594 रोजी जन्म झाला याठिकाणी आज अत्यंत जल्लोषात शहाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी नागपूर संस्थानचे मुधोजी राजे भोसले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनीयर विजय घोगरे वक्ते शिवश्री गंगाधर बनबरे मराठा आरक्षण समिती अध्यक्ष मराठा रामनारायण राष्ट्रीय क्षेत्रीय जनसंसद दिल्लीचे श्री महेश पाटील बैनाडीकर सर्वोच्च न्यायालयातील ऍड राज पाटील छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांना छत्रपती शहाजीराजे गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच मराठा छ* संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते

About जगन जाधव

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: