Thursday , December 8 2022
Breaking News

केद्रीय मंत्री मा.ना.श्री.रामदास आठवले साहेब यांनी केली अतिवृष्ठी झाकलेल्या भागाची पाहणी

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

मालेगाव (४ नोव्हेंबर २०२२)- राज्यात अवकाळी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्यशासन कटिबद्ध राहील असे भारत सरकारचे केंदीय समाज कल्याण मंत्री मा, ना, रामदासजी आठवले साहेब यांनी निफाड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेऊन पंचनामा करून भरपाई करून देण्यासाठी आश्वासन शेतकऱ्यांना दिले. दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी करतांना यावेळी रिपाईचे नेते काकासाहेब खंबालकर ,राज्य उपाध्यक्ष रवींद्र दादा जाधव, जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंढे ,ग्रा जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव, अनिल जाधव, वसनराव वाघ, शांताराम बागुल, दादाभाऊ केदारे ,वसंतराव जाधव, नितीन जाधव, दिपक जाधव ,प्रवीण डबाळे, आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी ओझर येथील शेतकरी विद्या नन्द, सत्यवान जाधव, याचे गट न ९३८ च्या 3 एकर द्राक्ष भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले .यावेळी ओझर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पो,हवा,ब्राम्हण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: