Thursday , December 8 2022
Breaking News

उमराणेत एस बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

 

 

सुराज्य न्युज l अमोल बच्छाव मालेगाव

मालेगाव ÷देवळा तालुक्यातील उमराणे येथील मेनरोडवर असलेल्या एस बँक शाखेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. सायरन वाजल्याने चोर पळाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून देवळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.मेनरोडवर असलेल्या एटीएमचे नियमानुसार रिपोर्टिंग घेण्यासाठी बँकेचे सुरक्षा रक्षक संदीप मोतीराया हे रविवारी (दि. १३) पहाटे पाच वाजता गेले असता त्यांना बाहेरचा सीसीटीव्ही कॅमेरा वाकलेला दिसला. तसेच एटीएम मधील कॅमेरा फोडलेला दिसून आल्याने मोतीराया यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. तसेच याबाबत देवळा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व विजय सोनवणे यांना ही या संदर्भात कळविले असता ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता सायरनची वायर तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वायर तोडताना सायरन वाजल्याने चोर पळाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. एटीएम जवळच असलेल्या जेनेरिक मेडिकलच्या सीसीटीव्हीत संशयित कार व तोंड बांधलेला चोर दिसून आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर एटीएम फोडुन लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: