Sunday , November 27 2022
Breaking News

आदिवासींचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या नंदुरबार नगरीत होणार ६ वे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्युज महाराष्ट्र

नंदुरबार( दि. ५नोव्हेंबर२०२२) प्रमुख स्थानिक आदिवासी संघटना व संकल्प आदियुवा जागृती संघटना ,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित होणारे यावर्षीचे ६ वे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन दिनांक १०,११, डिसेंबर २०२२ रोजी नंदुरबार शहर / ग्रामीण परिसरात होणार असुन काल झालेल्या नियोजन बैठकीत नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते संमेलनांच्या तारखेची घोषणा आदिवासी युवा संमेलन कोअर कमिटीच्या वतीने जाहिर केली.
या बैठकीस आदिवासी संघटनाचे प्रमुख पदाधिकारी व मार्गदर्शक डाँ.भरत वळवी ( आदिवासी महासंघ) , भिमसिंग वळवी, ( मौखिक साहित्य परिषद) , पंकजदादा ठाकरे (युवा प्रवक्ते ) , अँड. जयकुमार पवार (वीर एकलव्य सेना) , वासुदेव गांगुर्डे( डोंगर्यादेव संघर्ष समिती), कृष्णा गावित व राजेंद्र पवार (आदिवासी बचाव अभियान नंदुरबार ) तसेच संकल्प आदियुवा टिमचे संस्थापक चेतन खंबाईत, धुळे जिल्हाध्यक्ष डाँ,राहुल गावित, साक्री तालुकाध्यक्ष विनित सुर्यवंशी , संकल्प आदियुवा पेठचे प्रदीप इंपाळ सर, संकल्प सुरगाणा तालुका उपाध्यक्ष गणेश वाघमारे,कांतीलाल मोरे, संकल्प विद्यार्थी संघटना धुळे जिल्हाध्यक्ष विजय अहिरे , नंदुरबार येथील गवरलाल अहिरे , मगन पवार , काळू भोये, दिलीप गांगुर्डे ,ताराचंद सुर्यवंशी आणि आदिवासी महासंघ नंदुरबारचे अक्षय गवळी, योगेश पवार, कमलेश अहिरे तसेच संकल्प आदियुवा धुळे-नंदुरबार टिमचे संदिप गांगुर्डे ,बंडू अहिरे, राजू साबळे, नितीन चौधरी , दिलीप गांगुर्डे , प्रियांक वळवी व इतर सदस्य उपस्थित होते.
पुढील बैठकीत स्थानिक इतर आदिवासी संघटना पदाधिकारी व सदस्य यांना निमंञित करुन नियोजन करण्याचे ठरविले आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: