Thursday , December 8 2022
Breaking News

आजचे दिन विशेष ‌ दि .१ नोव्हेंबर २०२२

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐
‌ 🌞 दिन विशेष

‌सुराज्य न्युज महाराष्ट्र 

‌इसवी सन २०२२ – १ नोव्हेंबर
‌शालिवाहन शक १९४४, विक्रम संवत २०७९
भा. रा. १० कार्तिक १९४४
युगाब्द ५१२४
‌संवत्सर नाम: शुभकृत
‌अयन : दक्षिणायन
‌ऋतू : शरद
‌मास : कार्तिक
पक्ष : शुक्ल
‌तिथी : अष्टमी (२३.००) ~ नवमी
वार : मंगळवार
नक्षत्र: श्रवण
राशी: मकर

गोपाष्टमी
दुर्गाष्टमी

प.पू. शंकर महाराज प्रकट दिन, पुणे.

कर्नाटक दिन (कन्नड राज्योत्सव)
*राज्य स्थापना दिन – केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा.*
*जागतिक शाकाहारी दिन*

१९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१९८२:अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली. होंडा मोटार कंपनीने मेरिज्‌व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अ‍ॅकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.
१९७३:‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलून ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.
१९७३:लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप’ असे ठेवण्यात आले.
१९६६:पंजाब राज्याची  पंजाब  व  हरियाणा राज्यात विभागणी झाली.
१९५६: राजधानी दिल्ली केंद्रशासित प्रदेश बनली.
१९५६:भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
१९५६:दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन  कर्नाटक  राज्याची स्थापना करण्यात आली.
१९५६:केरळ राज्य स्थापना दिन
१९५६:कन्याकुमारी जिल्हा केरळ मधून तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
१९५३:आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.
१९३१: स्वातंत्र्यसैनिक तारकनाथ दास यांनी कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को शहरात गदर आंदोलन सुरू केले.
१८८१: कलकत्तामध्ये, मध्ये स्यालदाह आणि अर्मेनिया घाट दरम्यान ट्राम सेवा सुरू झाली.
१८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
१८४८:महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएस येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
१८४५:’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, मुंबई येथे सुरू झाले.
१७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.
१६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.

जन्मदिवस :
१९७३:ऐश्वर्या राय – अभिनेत्री
१९६३: भारतीय उद्योजिका, नीता अंबानी
१९४५: नरेंद्र दाभोलकर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक
१९२६:यशवंत देव – संगीतकार व गीतकार
१९२१:शरद गणेश तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार
१८९३: इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार

मृत्यूदिन :
२००५:योगिनी जोगळेकर – लेखिका,
१९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख
१९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी.
१९९१:अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक
१९८८: गोविंदस्वामी आफळे, ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार
१९५०:विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. ’पथेर पांचाली’, ’अपराजित’, ’आरण्यक’ या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत.
१८७३:दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार

*।। दास-वाणी ।।*

सुख पावे मातेजवळी ।
दुरी करितांचि तळमळी ।
अति प्रीति तयेकाळी ।
मातेवरी लागली ।।

तंव ते मातेस मरण आलें ।
प्राणी पोरटें जालें ।
दु:खे झुर्णीं लागलें ।
आई आई म्हणोनी ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०३/०२/१५-१६

नवजात बालकाला आईच्या कुशीतच सुरक्षित वाटते. जे सुख आहे ते आईमध्येच सामावलेले असते. थोडेसे जरी आईवेगळे केले तरी ते तळमळायला लागते. लगेच भोकाड पसरते. बालकाचे सर्व प्रेम हे फक्त आईसाठीच असते. आईचेही अगदी तसेच असते. याला म्हणायचे ममत्व. जे बालकाच्या संगोपनासाठी अत्यावश्यक ठरते.

दुर्दैवाने काही कारणाने आई अचानक मरण पावते. मूल पोरके होऊन जाते. आई गेली आहे हे जरी त्याला कळले नाही तरी ती आता समोर दिसत नाही. जवळ कोणी घेत नाही हे त्या बालकाला नक्की समजते. मग तो आईच्या आठवणीमध्ये झुरायला लागतो. अगदी केविलवाणा होऊन जातो.

ममत्व जितके जास्त तितका दुरावा दीर्घकाळ जाणवत राहातो.

स्वगुणपरीक्षा (अ) समास.

🙏 💐💐💐💐 💐 🙏

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आजचे दिनविशेष दि ३ नोव्हेंबर २०२२

सुराज्य न्युज महाराष्ट्र 💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐 ‌  🌞 दिन विशेष ‌ ‌इसवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: