Thursday , December 8 2022
Breaking News

आजचे दिनविशेष दि ०५ नोव्हेंबर २०२२

सुराज्य न्युज महाराष्ट्र

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌  🌞 दिन विशेष

‌इसवी सन २०२२ – ५ नोव्हेंबर
‌शालिवाहन शक १९४४, विक्रम संवत २०७९
भा. रा.   १४  कार्तिक १९४४
युगाब्द  ५१२४
‌संवत्सर नाम: शुभकृत
‌अयन : दक्षिणायन
‌ऋतू :  शरद
‌मास :  कार्तिक
पक्ष :   शुक्ल
‌तिथी :  द्वादशी (१७.००) ~  त्रयोदशी
वार :    शनिवार
नक्षत्र:  उत्तर भाद्रपदा
राशी:    मीन

*शनि प्रदोष*
चातुर्मास समाप्ती
*तुलसी विवाह प्रारंभ*

*जागतिक सुनामी जागृती दिन*
*मराठी रंगभूमी दिन*
विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते.  नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि. माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, (१९९५), दिलीप प्रभावळकर (२००७), रामदास कामत (२००८), शं.ना. नवरे (२००९), फैय्याज इमाम शेख (२०१०), रत्नाकर मतकरी (२०११), अमोल पालेकर(२०१२), महेश एलकुंचवार (२०१३), डॉ.जब्बार पटेल (२०१४) आदींना सन्मानीत केले आहे.

२०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.
२००७: गुगलने ने अँडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
२००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९५१:बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिनीकरण करुन ’पश्चिम रेल्वे’ची स्थापना करण्यात आली.
१९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
१८७२:महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.
१८४३:विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्यांना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.
१८२४:अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
१८१७:इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यातील खडकी येथील लढाई

जन्मदिवस :
१९२९:प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी
१८८५:विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ
१८७०:देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले.
१९३२: मारुती चितमपल्ली,  पक्षी, वन्यजीवनविषयक ग्रंथकार
१९५२: वंदना शिवा, भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखिका
१९५५:  करन थापर,  पत्रकार
१९८८:  विराट कोहोली,
क्रिकेटपटू

मृत्यूदिन :
२०११:भूपेन हजारिका – संगीतकार व गायक
१९९१:शकुंतला विष्णू गोगटे – कथालेखिका, कवयत्री व कादंबरीकार.
१९५०:फैयाज खाँ – हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी ’प्रेमपिया’ या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या.
१९१५:सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक
१८७९:जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ

*।। दास-वाणी ।।*

कुष्ट आणि वोला कुष्ट ।
पंडयारोग अतिश्रेष्ठ ।
क्षयरोगाचे कष्ट ।
या नांव अध्यात्मिक  ।।

वाटी वटक वायोगोळा ।
हाती पायी लागती कळा ।
भोवंडी लागे वेळोवेळां ।
या नांव आध्यात्मिक  ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

दासबोध : ०३/०६/२१-२२

देह इंद्रिये आणि प्राण यांना जाणवणारी देहातून उगवणारी दु:खे म्हणजे आध्यात्मिक ताप होय.

कुष्ट म्हणजे अंगावर कोड उठणे, वोला कुष्ट म्हणजे बोटे झडणारा कातडीचा महारोग, रक्त कमी होणारा रक्तक्षय किंवा पंडयारोग ज्यामधे त्वचा पांढरी पडते किवा फुफुसांचा क्षयरोग ज्याला राजयक्ष्मा म्हणतात. हे सर्व आध्यात्मिक ताप होत.

याशिवाय वातामुळे सतत पोट बिघडणे आणि दुखणे, हात पाय गुडघे सांधेदुखी सारखी जुनाट दुखणी,
भोवंडी म्हणजे पुन्हा पुन्हा चक्कर येणे ही देखील आध्यात्मिक तापामधे मोडतात.

आध्यात्मिकताप समास.

🙏 💐💐💐💐 💐 🙏

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आजचे दिनविशेष दि २ नोव्हेंबर २०२२

सुराज्य न्युज महाराष्ट्र 💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐 ‌  🌞 दिन विशेष ‌ ‌इसवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: