Thursday , December 8 2022
Breaking News

अगोदर गेली ५ वर्ष साकोलीत काय केले सांगा ; तरच मत मागायला जा

डॉ. अशोक कापगतेंचा संतप्त सवाल • जनतेसमोर सर्व निधींचा हिशोब मांडा •

आशिष चेडगे साकोली (भंडारा) प्रतिनिधी

साकोली (४ नोव्हेंबर २०२२) : सन २०१६ ला स्थापित साकोली सेंदूरवाफा नगरपरीषदेअंतर्गत आजपर्यंत काय काय मुख्य विकासमय कायापालट केला.? शहरस्तरीय कोणते प्रमुख कार्य केले.? प्रभागात किती बालद्याने बांधलीत.? किती जून्या शौचालयालाच रंगरंगोटी करून नविन दाखविले.? कुठे कुठे सिमेंट रोड बांधलीत व किती रोड आज रस्ताउखाड भ्रष्टाचारात फाटलीत.? स्वच्छ सर्वेक्षणात काय ठोस भुमिका साकारून कच-यांपासून खाद निर्मितीची मशीन गेली कुठे.? किती धनाढ्यांना गरज नसतांनी नाहक घरकुलाचा फायदा लाटून गरजवंत गोरगरीबांना डावलले.? रमाई आवास योजनेचा खरच बीपीएल धारकांना फायदा मिळाला काय.? २०१७ पासून आलेला सर्व नगरविकास निधी किती.? खर्च किती.? कुठे कुठे खर्च केलेत.? त्या सर्वांचा सविस्तर हिशोब, अंदाजपत्रकीय बिले, सामानांची साहित्यमालांची दूकानांतील कारखान्यांतील बिले काढण्यात येऊन सर्व हिशोब पारदर्शकपणे जनतेला दाखवा..! कारण दूस-यांच्या ५ वर्षात इतर नगरपंचायत तूलनेत नगरपरीषद साकोलीत करोडोंचा विकासनिधी येऊन सुद्धा साकोली जैसे थे अविकासमय का दिसत आहे हि जनतेच्या मनातील शंका दूर करावी अशी संतप्त मागणी माजी जिपस डॉ. अशोक कापगते यांनी केली आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: