Thursday , December 8 2022
Breaking News

पनवेल प्रवासी संघाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन

हेमंत सुरेश देशमुख रायगड जिल्हा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

पनवेल बस स्थानक 14 वर्षांपासून भोगतोय वनवास

मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख. मनोहरशेठ भोईर यांचा पनवेल बस स्थानकाच्या धरणे आंदोलनात जाहीर पाठिंबा

पनवेल (४ नोव्हेंबर २०२२) – पनवेल प्रवासी संघा च्या वतीने अभिजित पाटील, भक्तीकुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली “प्रस्तावित पनवेल बस स्टॅन्ड सुसज्ज पद्धतीने आणि लवकरात लवकर व्हावे” यासाठी आज लाक्षणिक धरणे आंदोलन केलें गेले. या धरणे आंदोलनात मा.आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर साहेबांनी पनवेल बस स्टॅन्ड येथे धरणे आंदोलना स्थळी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. पनवेल हे कोकण सवेत अखंड महाराष्ट्राचे प्रवेशद्वार मानले जाते. आणि या प्रवेश द्वारावरील बस स्थानकाची दयनीय अवस्था बघून नक्की बस स्टॅन्ड आहे कि नाही येवढी वाईट परिस्थिती झाली आहे.१४ वर्ष झाली तरी सोई सुविधाच्या अभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.या आंदोलनात उपस्थित प्रवाशी वर्गाची संख्या पाहूनच कळते कि,किती तीव्र भावना या बस स्थानकातील सेवा सुविधा नसल्या बाबत आहेत हे दिसते. प्रशासनाने प्रवाशी वर्गाचा विचार करुंन यावर वेळीच उपाय योजना करून लवकरात लवकर हे बस स्थानक कसे सुसंज्ज होईल हे करावे अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन करावा लागेल. असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून मा आमदार.मनोहरशेठ भोईर साहेबांनी दिला. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, पनवेल प्रवासी संघ, शेकडो प्रवासी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: