Saturday , December 3 2022
Breaking News

दिनविशेष ३०\११\२०२२ वार रविवार

|| सुमंगल सुप्रभात ||  
‌  🌞 दिन विशेष

सुराज्य न्युज /संपादक वार्ता

‌इसवी सन २०२२ – ३० ऑक्टोबर
‌शालिवाहन शक १९४४, विक्रम संवत २०७९
भा. रा. ८ कार्तिक १९४४
युगाब्द  ५१२४
‌संवत्सर नाम: शुभकृत
‌अयन : दक्षिणायन
‌ऋतू :  शरद
‌मास :  कार्तिक
पक्ष :   शुक्ल
‌तिथी :  षष्ठी
वार :    रविवार
नक्षत्र:  मूळ (०७.२०) ~ पूर्वाषाढा
राशी:  धनु

सूर्य षष्ठी
षठ् पूजा
संत सखुबाई पुण्यतिथी, कराड

जागतिक बचत दिन.
जागतिक ऑर्थोपेडिक परिचारिका दिन.

२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.
१९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
१९७३:इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
१९६६:शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
१९६०: ब्रिटन मध्ये पहिल्यांदा किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.
१९४५:भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्व मिळाले.
१९२८:लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.

जन्मदिवस :
१९६०:डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू
१९४९:प्रमोद महाजन, पूर्व केन्द्रीय मंत्री
१९२१: मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजकारणी भाई महावीर.
१९०९:डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
१८८७:सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील
१८५३: ब्रिटीश कालीन भारतातील प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी तसचं, भारतीय क्रांतिकारक संस्था अनुशीलन समितीचे प्रारंभिक सदस्य प्रमथनाथ मित्र.

मृत्यूदिन :
१८८३: दयानंद सरस्वती, तत्त्वज्ञ आणि विद्वान, आर्य समाजाचे संस्थापक
२०११:अरविंद मफतलाल – उद्योगपती
१९९८:विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक
१९९६:प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते
१९९४:सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री
१९९०:व्ही. शांताराम – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
१९९०:विनोद मेहरा – अभिनेता
१९७४:बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.

*।। दास-वाणी ।।*

रजोगुणी तमोगुणी ।
कपटी कुटील अंत:कर्णी ।
वैभव देखोन वाखाणी ।
तो येक पढतमूर्ख  ।।

समूळ ग्रंथ पाहिल्याविण ।
उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण ।
पाहे तो येक पढतमूर्ख  ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०२/१०/०७-०८

स्वत: रजोगुणी अन् तमोगुणी आहे. शिवाय मनामधे भरपूर कपट भरलय. कामधंदा नाही.सतत कुटाळक्या करीत फिरतो. स्वार्थासाठी नालायक माणसाचे वैभव पाहताच तोंड फाटेपर्यंत स्तुती करतो. स्वत:मधे असलेल्या सर्व दुर्गुणांची माहिती असूनही ते दूर करण्याचा यत्किंचितही प्रयत्न करत नाही तो पढतमूर्ख.

संपूर्ण ग्रंथ नीट वाचलेला नसतानाही अधिकारवाणीने ग्रंथाला, लेखकाला निव्वऴ मत्सरापोटी नावे ठेवतो. कोणी त्या पुस्तकातील चांगल्या गोष्टींविषयी सांगायला लागला तर पुस्तकाबरोबर त्यालाही वाईट ठरवून हा मोकळा. केवळ अहंकारापोटी विद्वानांनाही कमी लेखतो तो शहाणा असला तरीे मूर्खच. एक पढतमूर्ख.

पढतमूर्खलक्षण समास.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आजचे दिनविशेष दि ३ नोव्हेंबर २०२२

सुराज्य न्युज महाराष्ट्र 💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐 ‌  🌞 दिन विशेष ‌ ‌इसवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: