Thursday , December 8 2022
Breaking News

सप्तसृंगी माता प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त कणकोरी गावात तीन दिवसाचा हरीनाम सप्ताह.

सुराज्य न्युज / सुरेश सांगळे.

 

सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावामध्ये 23/04/22 ते 25/04/22 पर्यंत अखंड हरीनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे, कणकोरी गावातील श्री. भाऊसाहेब देवराम सांगळे व श्री. रामदास देवराम सांगळे. या दोन भावांची सप्तसृंगी मातेवर खुप पूर्वीपासून श्रध्दा आहे. यांनी स्वतःच्या जागेत सप्तसृंगी मातेचे भव्य असे मंदिर बांधले आहे. तसेच सप्तसृंगी मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त तीन दिवसाचा हरीनाम सप्ताहाचे नियोजन केले आहे. यामध्ये शनिवार दिनांक-23/04/22 रोजी,ह.भ.प.आरती ताई बुचकूल,(कणकोरी),रात्री 9:00ते 11:00 ,तसेच रविवार दिनांक-24/04/22 रोजी, ह.भ.प.रेखाताई काकड(निर्हाळे),रात्री 9:00ते 11:00 व सोमवार, दिनांक-25/04/22 रोजी सकाळी 10:00 ते 12:00 ह.भ.प.शिवलिलाताई पाटील यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच ह.भ.प.काशिकानंदजी महाराज यांचे हस्ते मुर्ती व कलश स्थापना होणार आहे. तसेच मंदिराचे सर्व पूजन गुरू योगेश शास्त्रीजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या तिन्ही किर्तनांसाठी तालमहर्षी मृदूंगाचारार्य मुकुंद महाराज लाड(कणकोरी) हे राहणार आहे.तसेच गायणासाठी निवृत्ती महाराज घुगे यांना आमंत्रित केले आहे ,कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यात ह.भ.प. रामनाथ महाराज शास्री व ह.भ.प.सुनिल महाराज जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: