Thursday , December 8 2022
Breaking News

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे धाडसी दरोडा दरोड्यात लाखोंचा ऐवज लांपास

 

योगेश म्हाळणकर सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर: तालुक्यातील वडगाव पिंगळा
येथे गुरुवारी दि. २४ संध्याकाळी
७.३० च्या सुमारास ८ जणांच्या
टोळक्याने ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे
यांच्या वस्तीवर धूडगूस घालत
माय-लेकाचे दोरीच्या सहाय्याने
हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी
लावून महिलेच्या गळ्यातील व
कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून
नेले. त्याचबरोबर कपाटातील २००००रुपये रोख रक्कम व लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घटना घडली.

याप्रकरणी पोलिससूत्रांनी दिलेली माहिती अशी की. वडगाव पिंगळा येथील भवानी मंदिराजवळ वास्तव्यास असलेले हे गुरुवारी टोमॅटो विक्रीसाठी गेले होते.
यावेळी त्यांची पत्नी मुक्ताबाई (५०) व मुलगा राहुल(३२) हे घरातील हॉल मध्ये टीव्ही बघत असताना पुढील बाजूच्या दरवाजाने आलेल्या 8 जणांच्या टोळक्याने अचानक घरात प्रवेश करत. हातात असलेल्या दोरीने बांधून ठेवले. राहुल मुक्ताबाई यांच्या तोंडाला चिकट पट्टी लावली हातात असलेल्या लाठ्या काठ्याने मारहाण करत मुक्ताबाई हुल्लूळे याच्या गळ्यातील व कानातील दागिने ओरबाडून घेतले त्या नंतर घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन दाराला बाहेरून कडी लावून पोबारा केला. त्यानंतर घाबरलेल्या राहुल. सरपटत मोबाईल जात मित्र राहूल विंचू याला फोन करत घटनेची माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी वस्तीकडे धाव घेत राहूल व मुक्ताबाई यांची सुटका करत.

मुक्ताबाई याना शिंदे (नाशिक) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीस पाटील सागर मुठाळ यांनी घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार . उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत गिलबिले. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे.सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी. हवालदार विनोद टिळे. गिरीश बागुल. नवनाथ शिरोळे. रघुनाथ पगारे .आदींनी घटनास्थळी धाव घेत.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: