Thursday , December 8 2022
Breaking News

डॉ.दौलतराव आहेर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

किरण अनिल सोनवणे. (इनपुट मिडिया महाराष्ट्र सुराज्य न्युज.)

 

देवळा (१ नोव्हेंबर २०२२)- कसमादेचे भाग्यविधाते, देवळा तालुका निर्मितीचे व रामेश्वर कालव्याचे जनक ज्यांच्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशकात आले असे धीरगंभीर, संयमी, प्रसंगी आक्रमक वाटणारे, जिल्ह्य़ात स्वतःचा नावाचा दबदबा निर्माण करुन दिल्ली दरबारापर्यत मजल मारणारे अलौकिक असं व्यक्तिमत्त्व म्हणजे वंदनीय, आदरणीय वै.डाॅ.दौलतराव आहेर तथा बाबा यांची आज जयंती.
घरातुन कुठलाही राजकारणाचा वारसा नाही फक्त जिद्दीच्या बळावर स्वतः मार्गाक्रम करीत राहीले आणि यशाच्या राजमार्गाच्या शिखरापर्यंत मजल मारली.बाबा म्हणजे हेवा वाटणारे असे अजब व्यक्तिमत्त्व व कर्तृत्व. नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करणारा असा हा दैदीप्यमान नेता.तत्कालीन काळ हा काँग्रेस पक्षाचा यशाचा सुवर्णकाळ म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यात भारतीय जनता पक्षाला भटजी ब्राह्मणाचा पक्ष म्हणून हिणवले जात अशा प्रतिकूल परिस्थितीत हा कोहिनूर भाजपच्या माध्यमातून विधानसभेत गर्जत राहीला.प्रसंगी कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाला जाग आणण्याचे काम त्याकाळात बाबांनी केले.मोडेल पण वाकणार नाही हा बाणा. बाबांनी एकदा दिल्ली पर्यंत मजल मारून नासिक लोकसभा मतदारसंघाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले.बाबांनी स्वकर्तृत्वावर यशाची शिखरे पादाक्रांत केली त्यावर कळस म्हणजे तत्कालीन युतीशासनाच्या कार्यकाळात मिळालेले आरोग्य मंञीपद.त्यापदालाही बाबांनी शंभर टक्के न्याय भागाच्या भल्याच्या ज्या योजना असतील त्या प्रामाणिकपणे राबविल्या.
तत्कालीन कळवण तालुक्यातील पुर्व भाग हा नेहमीच पर्जन्य छायेच्या प्रदेशात. त्यामुळे ह्या भागातील जनतेच्या नशिबी दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला होता.अतिशय विरोधाभास कळवण तालुक्यात होता.कारण पश्चिम भाग अतिशय सुजलाम सुफलाम होता.पुर्व भागातील जनतेच्या वेदना बाबा जाणून होते.बाबांनी जरी राजकारणाचा सारीपाट नाशकातुन मांडला होता पण त्यांचे सदैव लक्ष जन्मभुमी कडेच असायचे. हा दुष्काळाचा डाग कायमचा पुसण्यासाठी बाबांनी अतोनात प्रयत्न केले पंरतु योग्य संधी मिळत नव्हती.अशी सुवर्णसंधी युतीशासन काळात बाबांनां चालून आली. आपले वजन वापरून कालव्याचा प्रश्न मार्गी लावला.आज दहिवड पर्यंतची जनता बाबांना लाखमोलाच्या दुवा देतात.पावसाळ्यात मोसमी पाऊस आणि गिरणा नदीचे पुरपाणी रामेश्वर कालव्यात सोडून दहिवड मेशी पर्यंत पाणी जाते. त्यामुळे जमिनीची वाॅटर लेव्हल वाढून येथील शेतकरी आठमाही वा बारमाही पिके घेवु लागला. असे बाबा दूरदृष्टीचे जाणते नेतृत्व होते.असे अनेक नाव घेण्यासारखे प्रकल्प बाबांनी फक्त आपल्या हिमतीवर आणले.
विधानसभा वा लोकसभा असो बाबांनी सहकारात ही शिरकाव करत तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवला.मराठा विद्याप्रसारक समाज असो किंवा वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना असो येथे ही आपल्या कामाची मोहर उमटवली.
मविप्रत बाबा सत्तारुढ होण्या आधी बर्‍याच शाळा ह्या मंदिरात, ग्रामपंचायतच्या जागेवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग भरत. बाबांनी मवीप्रची सुञे हाती घेतल्यावर एकाच छताखाली सर्व वर्ग भरु लागलेत. प्रशस्त इमारती दिमाखात ऊभ्या राहिल्या असं हे दूरदृष्टी असणारं ऊमदं नेतृत्व होतं.
जाता जाता एकच म्हणेल की आताच आपले दुसरे भुमीपुञ वै.शांताराम तात्या आहेर यांचे ही नुकतेच निधन झाले.बाबा तात्या हे समवयस्क त्यामुळे राजकीय कारकिर्दीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी चाणक्याप्रमाणे नेत्यांना साम,दाम, दंड भेद नितीचा अवलंब करून आपआपले बालेकिल्ले शाबुत ठेवण्यासाठी आटेकाट खटाटोप करतात.दोघांचीही राजकीय जीवनातील वाटचाल ही प्रतिकूल परिस्थितीतुन ऊदयास आलेली. दोघांनी आपआपल्या परीने राजकारणाच्या यशोशिखरापर्यत मजल मारलेली.त्यामुळे दोघे ही अलौकिक असे निधड्या छातीचे वादळी व्यक्तिमत्त्व होते.आणि आपणांस इतिहास ज्ञात आहेच की एका म्यानात दोन तलवारी रहावू शकत नाही.पंरतु नियतीने ती ही वेळ दोन्ही नेत्यांना दिली पण तोपर्यंत खुपच ऊशीर झाला होता कारण वयोमानानुसार दोन्ही टायगर थकून ऊतारवयाकडे त्यांची वाटचाल होती असो. पण मी म्हणेन बाबा आणि तात्या म्हणजे आपल्या देवळ्याचे कोहिनूर. कारण ह्या दोघांमुळेच तत्कालीन वर्तमानपत्रातील फ्रंट पेजवर देवळा होते.
असो.बाबांच्या व तात्यांच्या पविञ स्मृतिंना विनय अभिवादन करून भावपूर्ण आदराजंली.
बाबा व तात्या यांच्या कार्याचे स्मरण करुन देवळा व परिसरातील जनता आपले नेहमीच ञणी असतील.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

गोरक्षनाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र चांदवड (८ नोव्हेंबर २०२२) – मातोश्री बहुउद्देशीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: