Thursday , December 8 2022
Breaking News

आपदग्रस्तास श्री गणेश मढीकर यांचा मदतीची हात

संदिप घोडके जालना प्रतीनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र

जालना (२७ ऑक्टोबर २०२२)- श्री स्वामी समर्थ ड्रायकिल्नर्स ला दिनांक २२/१०/२०२२ रोजी बुधवारी सकाळी तिन वाजता भयानक आग लागली. या आगीच्या भक्षस्थानी अख्खे दुकान जळून खाक झाले. सकाळी ची वेळ असल्यामुळें आग विझविण्याचा प्रयत्न फारसा कुणाकडून झालेला नाही. असे समजते, या आगीत श्री.शंकर प्रकाश सिरसाठ गादीया रोड यांचे लाखो चे आर्थिक नुकसान झाले. त्या मध्ये काही ग्राहकांचे कपडे, दुकान चे इतर साहित्य, काही मशनरी जळून खाक झाले .आग लागण्याच्या कारणाचा शोध घेतला तर शाॅर्टसर्किट मुळे आग लागल्याचे समजते.त्यामुळे झालेले नुकसान म. रा.विज वितरण कंपनी भरून दिले पाहिजे. अशी जनमानसातील चर्चा आहे.आहे बेधुंद मस्तीत असलेले विज वितरण कंपनी चे अधिकारी मेरी भी चूप तेरी चुप या स्थितीत आहे शंकर प्रकाश शिरसाठ यांचा उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ते बेरोजगार तर झाले च कुटुंबातील लोकावर उपासमारीची पाळी आली असे औरंगाबाद येथील समाजसेवक, राष्ट्रीय ओ.बी.सी.महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते,अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री गणेश भाऊ मढीकर यांनी घटना स्थळाला प्रत्यक्ष दिली.सोबत काही सामाजिक कार्यकर्ते श्री पंडित सोनवणे बंडूभाऊ मोरे कल्याण मढीकर, विजय पैठणकर,गजानन सिरसाठ विक्रम सिरसाठ निलेश सिरसाठ, युवराज पैठणकर, आदी समाज बांधव उपस्थित होते सदरहू घटनेची दखल घेत व वस्तुस्थिती पाहणी करत शंकर प्रकाश सिरसाठ यांच्या हलाखीच्या परिस्थिती चे अवलोकन करून, व त्यांच्या वर अवलंबून असलेली परिवारातील सदस्य,यांचा विचार करून क्षणाचा ही विलंब न लावता श्री गणेश मढीकर यांनी स्वतः रोख रू दहा हजार ची आर्थिक मदत केली, व इतर दानशूर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकाश सिरसाठ यांना मदत करण्याचे विनंती वजा आवाहन केले.
श्री.गणेश मढीकर यांनी दिलेल्या तात्काळ मदतीची जिकडे तिकडे चर्चा आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: