Saturday , November 26 2022
Breaking News

शेतकऱ्यांना व सिन्नरकरांना न्याय मिळावा, प्रहार संघटनेचे तहसील समोर आंदोलन…

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके

सिन्नर :- शेतकरी व सिन्नरकरांना न्याय मिळावा आणि यासाठी आमदारांनी विधीमंडळात आवाज उठवावा.यासाठी सिन्नर प्रहारने तालुका अध्यक्ष शरद तुकाराम शिंदेपाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील समोर मुंढण आंदोलन केले.

आदरणीय आमदार साहेब यांनी सिन्नरला आंदोलन करणे हास्यास्पद आहेत. हे म्हणजे सरपंचांनी शिपायापुढे ग्रामपंचायतीच्या पुढे आंदोलन केल्या सारखे आहेत. जर बिलाचे हफ्ते करणे ,वीज जोडणे। सिन्नरच्या अधिकारी यांच्या हातात नाही तर इथ आंदोलन करण्याला काही अर्थ नाही.तुम्ही सत्ताधारी आमदार असताना आंदोलन करणे हे हास्यास्पद व राजकीय स्टंट जनतेला वाटतोय. कारण सिन्नरची जनता एवढी भोळी नाहीत.आंदोलन करणे आम्हा विरोधकांच काम आहेत. विशेष म्हणजे वीज वसूल, कर्जवसुली जप्ती, बारागाव पिंपरी, सूळेवाडी लिफ्ट बोजा,राशन धान्य,सिन्नरकरांची वाढीव घरपट्टी, घरकुल,जमीन मंत्रालय विषय आहेत. विधीमंडळात आवाज उठवला तर न्याय मिळेल.यासाठी तुम्हाला सिन्नरच्या जनतेन आमदार केलय.
आपण आमचे खालील विषय काही मंत्रालयाचे आहेत.
निवेदन दि.९मार्च २०२०
माननीय मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र राज्य
माननीय विजमंत्री
महाराष्ट्र राज्य
माननीय महसूलमंत्री
महाराष्ट्र राज्य
माननीय नगरविकास मंत्री
महाराष्ट्र राज्य
माननीय कामगार मंत्री
महाराष्ट्र राज्य
माननीय कलेक्टर साहेब
नासिक
माननीय प्रांत साहेब
निफाड सिन्नर
माननीय तहसीलदार साहेब
सिन्नर
विषय -शेतकरयांच्या व सिन्नरकरांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणे बाबत
मा.महोदय,
आम्ही आपणास विनंतीपुर्वक कळवितो की १)शेतकरयांना मुबलक व दिवसा विज मिळावी.
२)शेतकरी व मजुर ,व्यावसायिक यांची विज कट होऊ नयेत.त्यांना विज बील भरण्यासाठी सवलत मिळावी.
३)गावोगावी काही तलाठी यांची वाढत असलेली अरेरावी व काही तलाठी यांनी परस्पर शेतकरयांची जमीन परस्पर दुसरयांच्या नावे करणे.हे थांबवुन शेतकऱ्यांना जमीन परत मिळावी.
४)काही गावातील धनाढ्य गोरगरिबांच्या जमिनी हडप करत आहेत. काही ग्रामपंचायती सुदधा शेतकरयांच्या जमीनवर कब्जा करत आहेत.ते थांबवून जमीन परत मिळावी.
५)गोरगरिबांना रेशन कार्ड आहेत परंतु रेशन मिळत नाहीत. ते मिळावे
६)गरिबांना रेशन मिळत नाहीत. परंतु सदर रेशन धान्य ट्रकाच्या ट्रका बाहेर विकले जातात ते थांबावे.
७)midcतील व एसटी कामगारांच्या गेलेला रोजगार, नोकरया परत मिळाव्यात.
८)सिन्नरच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी एखादी ठोस योजना राबवावी.
९)बारागाव ,सुळेवाडी, पाटपिंम्प्री परिसरातील लिप्ट बोजे कमी करावे
१०)अपंगांना घरकुल व ५टक्के निधी मिळावा.गरिबांना घरकुल मिळावे.
११)नगरपालिका वाढीव घरपट्टी कमी करण्यात यावी.
या मागणीसाठी बुधवार दिनांक ९/३/२०२२रोजी सकाळी११.३०तहसील कार्यालय समोर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ठिय्या आंदोलन व मुंढण करण्यात आंदोलन करण्यात आले आहेत. कारण सिन्नर तालुक्यातील शेतकरी वारंवार मागणी करुनही न्याय मिळत. नाहीत. सिन्नर तालुक्यात वीज नाहीत. दोन वर्षे लोकडाऊन असल्याने उतपन्न नव्हते. आता पिकं हाती यायची तर वीज मंडळाने गेल्या तीन महिन्यापासून सारखे ट्रान्सफर तोड,वीज तोड मोहीम राबवुन ऐन पिक जोमात असताना, पाणी आसताना पाणी देता आले नाहीत. शेतकरी व गोरगरीब जनता टप्प्याने बील भरायला तयार तर तीही सवलत मिळत नाहीत. बीलाचे हफ्ते करुन देण्याचे अधिकारच सिन्नर कार्यालयास नसल्याने हफ्त्याहफ्त्याने बील भरू शकणारयांची कोंडी झाली आहेत. घरात वीज नाही. वीज पंप बंद,२०गाव पाणीयोजना पुरवठा योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित केला जातो.त्यामुळे जनतेची व जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहेत.न्याय मागायला गेल तर उलट पोलीस केसेस केल्या जातात.
अंगठेबहादर शेतकरयांच्या जमिनी परस्पर सहयांचे खोटे दस्तऐवज करुन सदर शेतकरयांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. उद.हिवरेपिंपळे येथील कोंडाजी कारभारी बिन्नर शेतकरी,सोनांबे येथील राजेश घोडे व त्यांचे वडील असे अनेक शेतकरयांना भूमिहीन केल गेल आहेत. तलाठी व काही गावकरी याकामी सहभागी आहेत.
तालुक्यात गोरगरीब शेतकरी, मजुर यांना पिवळे,लाल,केशरी सारेच रेशनकार्ड आहेत. परंतु धान्यच मिळत नाहीत. एकीकडे गरीबांना धान्य कमी किंवा वरूनच धान्य नाही म्हणून गरिबांना धान्य नाहीत. तर दुसरीकडे काळया बाजारात विकायला रेशनच्या धान्याचे ट्रक पकडले जातात. मग गरिबांना वारंवार मागणी करूनही धान्य मिळत नाही.
वारंवार मागणी करूनही अपंगास घर व ग्रामपंचायतीचा ५टक्के निधी मिळत नाहीत. गरीबांना घर मिळत नाहीत.
बारागाव पिंपरी,सुळेवाडी, निमगाव लिप्ट बंद असताना जमिनीवर बोजे आहेत. ते कमी करण्यात येत नाहीत.
सिन्नर शहरात व उपनगरात अव्वाच्या सव्वा घरपट्टी आहेत. ती कमी करण्यासाठी वारंवार मागणी करुनही न्याय मिळत नाहीत.
आमच्या जमिनीवर midcउभी केली परंतु भुमीपुत्रांना नोकरी मिळत नाहीत. अनेक एच एन जी ग्लास लि.,केला,सुपर कंपन्यांनी १५/२०वर्षापासून काम करणारे कामगार काढल्याने ते उदधवस्त झाले आहेत. अनेक वर्षे, महिने कामगार आंदोलन करताय परंतु न्याय मिळत नाहीत.
शासन,प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन न्याय दिला पाहिजे. परंतु प्रशासन गांभिर्याने घेय नाहीत. आणि लोकप्रतिनिधीही पुर्वी प्रमाणे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे शेतकरी, कामगार व गोरगरीब भरडला जात आहेत. शासनाने व लोकप्रतिनिधी यांनी गांभिर्याने घ्यावे.आमदारांनी विधानभवनात व आदरणीय मुख्यमंत्री साहेब तसेच त्या त्या खात्यांच्या मंत्री महोदयांकडे मांडुन न्याय मिळवून दयावा. परंतु आमदार साहेब वरती मांडण्या ऐवजी खालीच जर एखाद शोसाठी आंदोलन करणार तर न्याय कसा मिळेल.प्रशासन, अधिकारी जर जनतेच्या हिताची काम करणार नसेल तर गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल?
आपण जर काम करणार नसाल,सरकार दरबारी मांडणार नसाल,आपल कुणी ऐकत नसेल तर लोकप्रतिनिधी यांनी राजीनामा दयावा. अधिकारी जर योग्य काम खरणार नसेल तर बदली करण्यात यावे.परंतु सिन्नर तालुक्यातील जनतेवर अन्याय करून नये.न्याय दयावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
आमदार कोकाटे साहेब यांनी राजीनामा दयावा यासाठी मंगळवारी सिन्नर प्रहारच ठिय्या आंदोलन-शरद शिंदेपाटील तालुकाध्यक्ष व सहकारी-
आमदार कोकाटेसाहेब प्रथम राजीनामा दया मग वीजेच्या विरोधात आंदोलन करा.किंवा आदरणीय मुख्यमंत्री साहेब व पवार साहेब यांना ठणकावून सांगा पुरेशी विज दया व लोकडाऊन काळातील वीज माफ करा,शेतकरी व गोरगरीब जनतेची वीज तोडु नका.आंदोलन काय करता सत्तेत असताना.?जेंव्हा सुलतानी वसुली केली ,वीज तोडून सारा तालुका अंधारात ठेवला.तेंव्हा सरकारची बाजु घेतली .आता ९०टक्के वसुली झाली मग आंदोलन?.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उर्जा मंत्री, सरकार तुमच. तुम्ही आमदार, मुलगी जिल्हा परिषद सदस्य, तुमचे पंचायत समिती सदस्य,नगरसेवक तरी आंदोलन?तरी आंदोलन तेही आता?फक्त निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन नाटक.लोकडाऊन काळात कडक वसुली असताना नाही आले मदतीला सिन्नरच्या जनतेसाठी. सारा तालुका अंधारात होता.शेती पंप डिप्या बंद असल्याने पिक जळाली शेतकरी बांधवांची.घरात अंधार होता गोरगरिबांच्या घरात.शेतकरयावर पोलीस केसेस झाल्या.लोकडाऊन काळात कडक सुलतानी वसुली होती .जेंव्हा शेतीला पाणी होत १५०डिप्या बंद होत्या तेंव्हा बच्चुभाऊ यांचे प्रहार तालुकाध्यक्ष शरद शिंदेपाटील व पदाधिकारी रस्ता रोको,आसुड आंदोलन ,,भजन आंदोलन, मुख्यमंत्री यांना हंडा भेट दिला, उपोषण करत जनतेसाठी धावले.विज चालू केली तेंव्हा हे कुठे होते?आज पाणी संपल. जनता बिल भरून बसली.आता हे जागे झाले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक आली.मतासाठी धूळ फेक. अहो सरकार तुमच, आमदार,जिल्हा परिषद सत्ता असताना आंदोलन कराव लागतय हि शोकांतिका व हास्यास्पद आहेत.मग सत्ता का दयावी तुम्हाला?आंदोलन तर शरद शिंदेपाटील करतो न्याय देतो.मग काय फरक तमच्यात व त्यांच्यात?अहो आंदोलन करण्या ऐवजी वरून मंजुरी आणा.विधानसभेत आवाज उठवा, मांडा .तुम्हाला आमदार विधानभवनात मांडण्यासाठी केलय.इथ आंदोलन करण्यासाठी नाहीत. मग आपल कुणी ऐकत नसेल,आपल्याला सरकारमधे किमंत नसेल तर राजीनामा दयावा आमदारकीचा.पण निवडणूक आली म्हणून धूळफेक करु नका. आम्ही सिन्नरकर तुमच्यावर प्रेम करतो म्हणून इतक भोळ समजू नका सिन्नरकरांना.उलट आमदार कोकाटे साहेब व माजी आमदार वाजेभाऊ तुम्ही दोघांनी एकत्र तुमच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व उर्जा मंत्री यांच्याकडे एकत्र जावा आणि सिन्नरचा विजेचा प्रश्न मार्गी लावावा.हव तर शरद शिंदेपाटील हेही येतील सिन्नरच्या जनतेसाठी आदरणीय उदधवजी ठाकरे साहेब यांच्याकडे.साहेब चांगले ओळखतात शिंदेपाटील यांना. कारण त्यांनी. अडचणी काळात शिवसेना सिन्नर तालुक्यात उभी केलीय.शिवाय मागे.शिंदेपाटील सिन्नरच्या शेतकरयांसाठी मातोश्री समोर.बसले होते. शेतकऱ्यांना न्याय मिळालाय.तुम्ही आजीमाजीन तुमच सरकार असताना काम मंजूर करुन आणावी. विनाकारण येथज आदळआपट करु नयेत. विधानभवनात आपला पहाडी आवाज उठवून सिन्नरकरांचा प्रशन बुलंद करावा.आम्हाला अभिमान वाटेल.पण हे म्हणजे राजा असुन कर्मचारयांच्या पाया पडायच……सरकारमध्ये थयथयाट करा लढा.पण हि इथ नाटकबाजी नको.
आम्हाला पुर्वीचा धडाकेबाज आमदार कोकाटे साहेब हवेत.हे अस नको.
कळावे
शरद तुकाराम शिंदेपाटील
तालुकाध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका.
यावेळी गोपाळ गायकर, शिवाजी गुंजाळ, सुनील महाराज,संदिप लोंढे, जयराम शेळके,बापु सानप,कोंडाजी बिन्नर,पंकज पेटारे, सुरज सानप,क्रुष्णा लहाने,गणेश सानप,शांताराम लहामगे,उत्तम लोंढे, प्रकाश दोडके,राहुल रुपवते, चिंधुभाऊ गुंजाळ, गणेश चव्हाण,हिरामण जाधव,अर्जुन घोरपडे,महादु बिन्नर,बबन बिन्नर,संतु बिन्नर,प्रकाश आगवणे,

About जगन जाधव

Check Also

सिन्नर येथे सिलेंडर चा अचानक स्पोट पती- पत्नी गंभीर जखमी

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र   सिन्नर: (८ नोव्हेंबर २०२२) – पाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: