Saturday , December 3 2022
Breaking News

वायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा “शाळा पूर्व तयारी मेळावा” उत्साहात साजरा*

*वायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा “शाळा पूर्व तयारी मेळावा” उत्साहात साजरा*

सुराज्य न्यूज – हितेंद्र दुसाने

बागलाण तालुक्यातील वायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे
“शाळापूर्व तयारी मेळावा” उत्साहात साजरा करण्यात आला.
सन २०२२/२३ या शैक्षणिक वर्षात शाळेत इयत्ता १लीत‌ दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ८:३० मिनटांनी गावातून प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले, दाखलपात्र मुला-मुलींचे सजवलेले ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढली. प्रभातफेरीत ढोल-लेझीम गजर करत, विद्या शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. व शाळेतील उपस्थितीसाठी आव्हान केले.

सर्व विद्यार्थी व पालकांचे शाळेत स्वागत करण्यात आले त्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेट देण्यात आल्या, गावाचे सरपंच श्री. अशोक अहिरे व केंद्राचे केंद्रप्रमुख श्री डि.जे. काकळीज यांनी सरस्वतीचे पूजन केले.
याप्रसंगी गावचे सरपंच व प्रति‌ष्ठित ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी, अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई उपस्थित होते. १लीत दाखल होणाऱ्या मुलांना शिक्षणात वाचन-लेखन, गणन या मूलभूत क्षमता विकसित करताना अडथळे निर्माण होऊ नयेत, म्हणून पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दाखलपात्र विद्यार्थ्यांचे पावलांचे ठसे घेण्यात आले. तसेच शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास व भावनिक विकास गणनपुर्व तयारी अशा विविध विषयांवर आकर्षक स्टॉल मांडण्यात आले होते. त्यातील साहित्य मुलांनी
हाताळत कृतींचा आनंद लुटला केंद्रप्रमुख श्री. डी.जे.काकळीज आबा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व आपले मनोगत व्यक्त केले.

सदर यशस्वितेसाठी वायगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. कापडणीस सर, सर्व शिक्षक, बंधू भगिनी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आदि. यांनी परिश्रम घेतले.

About चंद्रकांत आहिरे

Check Also

सोमपूर येथे कृषिदुतांनी केले जैविक खता विषयी मार्गदर्शन

मनीष शेलार सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र सटाणा(२७ नोव्हेंबर २०२२) : रासायनिक खताने जमिनीचा पोत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: