Saturday , November 26 2022
Breaking News

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांनी उद्योजकतेतून स्वयंनिर्भर व्हावे – मा.योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव सुराज्य न्यूज महाराष्ट्र

धरणगांव (२५ नोव्हेंबर२०२२)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना १५% अनुदानावर मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याकरिता शासन निर्णय क्रमांक – जमीन – मसाका 2018 /प्र.क्र.259 (2) /अजाक, दि.8 मार्च, 2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील २५% मधील जास्तीत जास्त १५% मार्जीन मनी उपलब्ध करुन मान्यता देण्यात येते. सदरील पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी १०% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत १५% मार्जीन मनी शासनामार्फत देण्यात येते.
अर्जासोबत अर्जदाराचा फोटोग्राफ, जातीचा दाखला, उद्योगाचे नोंदणी प्रमाणपत्र, उद्योगासाठी निवडलेल्या जागेचा 7/12 उतारा व पूर्ण पत्ता, रहिवासाचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याची संपूर्ण माहिती व हमीपत्र (शपथपत्र / नोटरीव्दारे). या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

हदगाव येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने राज्यपालाचा पुतळा दहन करून जाहीर निषेध करण्यात आला

हदगाव प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगाव (२२ नोव्हेंबर २०२२): स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष माधवराव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: