Thursday , December 8 2022
Breaking News

सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला दैव बलवंत म्हणून वाचले प्राण, परीसरात बिबट्या मुक्या प्राण्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात

एकनाथ अहिरे विरगाव सुराज्य न्यूज प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील वटार येथिल सावतावाडी वस्तित बिबट्याने गेल्या एक वर्षांपासून धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकरयांच्या दुभती जनावरांवर ताव मारत आहे काल सायंकाळी वटार शिवारातील शाळेच्या पांदिच्या रस्तावर रात्री आठ वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना राजेंद्र श्रावण बागुल यांच्यावर चालत जात असताना जब्बर हल्ला चढविला सुरवातीला पंझा मारून खाली पाडले तेवढ्यात अशोक बागुल त्याचं रस्त्याने जात होते तर त्यांनी पाहिले असता बिबट्याने कोणावतरी हल्ला केला आहे हे लक्षात येताच आरडाओरड केल्याने बिबट्याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. तरीपण बिबट्या तिथेच न थांबता पुन्हा रात्री दोन-तीन रात्री शेतात पाणी देत असलेल्या शेतकऱयांना दर्शन देऊन बिबट्याने आपली दहशत कायम ठेवली आहे.
गेल्या एक वर्षांपूर्वी बिबट्याने कार्तिक बापु बागुल या बालकांवर जब्बर हल्ला केला होता सुदैवाने त्याचे प्राण वाचले, नंतर काळू दशरथ महारणर या मेंढपाळ तरुणावर हल्ला केला त्यात त्याचे प्राण वाचले, सहा महिनंपूर्वी वृद्ध महिलेवर हल्ला चढवला होता प्रसंगवधानाने महिलेचे प्राण वाचले आठ महिन्यापूर्वी रमण नारायण खैरणार ह्या तरुण शेतकार्यावरयी बिबट्याने हल्ला चढवला होता सुदैवाने त्याचे प्राण वाचले, परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला असून दररोजच् सायंकाळ पासुनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेहि मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व मेंढपाळ धास्तावला आहे.
चौकट
” गेल्या बारा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून २० ते २५ निष्पपाप मुक्या प्राण्यांचा जीव गेला आहे, अनेक दिवसापूर्वी सावतावाडी शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवा उडवीचे उत्तर देऊन आपल्या अंगावरचे काम झटकत असतात, सावतावाडी परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन  तीन शेतकऱ्याना मुक्त दर्शनही दिले आहे. दरववर्षि पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतो व् पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपन्यासाठी मोठी काटेरी जुड़पे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फत्य करुण घेतो”.
मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी १० ते १२ मेँढ़या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोड़धंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुण काडावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.
गेल्या तीन ते चार महिन्यात २५ पाळीव प्राण्याना आपला जिव गमवावा लागला असून, भक्ष्याच्या शोधत बिबटया वस्तीनवर मुक्त दर्शन देतो तरिपन प्रशासन काय करत आहे. असच चालत राहील तर बिबट्या लवकरच मानवी हानी होऊ शकते अस परिसरातील नागरिकांच् मत आहे.
कोट :-
सायंकाळच्या सुमारास  रस्त्याने जात असताना बिबट्याने माझ्यावर हल्ला केला पंझा मारून खाली पाडले मला कोणीतरी पाहिले व आरडाओरड केली, आरडाओरड केल्यामुळे बीबट्याने पळ काढला, घनदाट झाडी व लपायला जागा असल्यामुळे बिबट्या पळून गेला, रात्री शेतीला पाणी देत असताना बिबट्या दर्शन देतो, दिवसा सुरळीत लाईट नसल्यामुळे रात्री पिकाला पाणी द्यावे लागते, आज माझ्यावर हे संकट आले आहे उद्या कोणावरहि येऊ शकते त्यासाठी वनविभागने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
राजेंद्र श्रावण बागुल (युवा शेतकरी वटार)
फोटो नावे:- राजेंद्र बागुल यांच्या वर बिबट्याच्या हल्यामुळे झालेल्या जखमा.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: