Thursday , December 8 2022
Breaking News

ध्वजावतरण करून जपला राष्ट्रध्वजाचा सन्मान

धरणगाव तहसिल ला दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल.

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव

धरणगाव(२५ नोव्हेंबर २०२२) — येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज लावण्यात आलेला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त लावलेला राष्ट्राध्वज १५ ऑगस्ट २०२२ पासून अविरतपणे ऊन, वारा, वादळ, पावसाची तमा न बाळगता आनंदाने फडकत होता. डौलाने फडकणाऱ्या या राष्ट्रध्वजाकडे पाहून त्याग – समर्पण – बलिदान आणि राष्ट्रप्रेमाची अखंड प्रेरणा सदैव मिळत असते. मागील ३ महिन्यांपासून फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे रंग धूसर झालेले पाहून मन विचलित झाले व काही जागृत धरणगावकर नागरिकांनी तहसिल प्रशासनाला राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत धरणगाव तहसिलचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी नगरपरिषदेला लेखी सूचना दिल्या. या सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करून धरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दनजी पवार यांनी लेखी आदेश देऊन राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण करायला सांगितले. संबधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत अंमलबजावणी केली आणि याच अनुषंगाने राष्ट्रध्वजाचा मान-सन्मान जपला गेला. ‘आपला राष्ट्रध्वज आपला अभिमान’ या भावनेतून प्रशासनाने केलेल्या कार्याचे नागरिकांनी तोंडभरून कौतुक केले तसेच आभार देखील मानले. ध्वजावतरण करण्याच्या संदर्भात दिलेल्या निवेदनाला न्यूज पोर्टल, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिध्दी मिळाल्याने निवेदनकर्त्यांनी डिजिटल मीडिया व प्रिंट मीडियाचे आभार मानले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: