Saturday , December 3 2022
Breaking News

सटाणा शहरात कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामवंत पैलवान यांचा सहभाग…

सुराज्य न्युज / गणेश सोनवणे

सटाणा :- शहराच्या कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतल्याने भरविण्यात आलेल्या कुस्तींची दंगल एक मनोरंजक उत्सव साजरा झाला.या कुस्तीच्या सामन्यामध्ये आकर्षक ठरलेली कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी सातारा येथील किरण भगत व दिल्ली केसरी बंटी कुमार या दोघांमध्ये सामना झाला. सुमारे ११ मिनट दोघ पहिलवानांमध्ये निकराची झुंज झाली. त्यात अखेर उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांनी बाजी मारली. यावेळी मैदानाबाहेर फटाक्यांची तुफान आतिषबाजी झाली, तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्याचे अभिनंदन व कौतुक केले.

सटाणा शहरात दिवंगत माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या ८ व्या स्मृतीप्रित्यर्थ माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे मित्र मंडळ व मल्हार युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने सटाणा शहरात महाराष्ट्र व इतर राज्यातील नामांकित मल्लांना निमंत्रित करून भव्य कुस्त्यांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. पाठक मैदानावर 40 × 40 आकारात ५ फुट उंचीचा लालमातीचा आखाडा तयार करण्यात आला होता. निमंत्रित मल्लांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस अधिक्षक सचिन पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले तर परम पुज्य जितेंद्र दास महाराज खिरमाणे येथील बालाजी हनुमान मंदीराचे पुजारी व पुरोहित प्राध्यापक डॉ. धनंजय पंडीत यांच्या मंत्रच्चोरात उद्घाटन पार पडले. यावेळी पाठक मैदान गर्दीने खच्चून भरले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

पाठक मैदानावर आज पावेतो झालेल्या सर्व राजकीय व सामाजिक गर्दी पेक्षा प्रेक्षकांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती होती.कसमादे परिसरासह नाशिक जिल्हा व बाहेर गावांमधील तालीम संघाचे पदाधिकारी व मल्ल सामने पाहण्यासाठी हजर होते.

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लहान बक्षीसांच्या कुस्तींना प्रारंभ झाला मुख्य आकर्षण असलेल्या कुस्तीपैकी पहिला सामना नांदेड येथील राजू पाटील व मथुरा येथील हरींदर गुजर यांच्यात बघावयास मिळाला. सुमारे अर्धातासापेक्षा अधिक वेळ दोघ मल्लांमध्ये जिंकण्यासाठी स्पर्धा रंगली. बर्‍याच वेळा दोघांमध्ये जिकरीची झुंज देखील झाली. मात्र दोघ पैलवान एकास एक सरस ठरत असल्यामुळे पंचांनी डाव थांबवून दोघ स्पर्धकांना विजेते घोषित करून कसमादे प्रोड्युसर कंपनीचे संचालक गणेश सुरेश पवार यांनी दोघ स्पर्धकांना ४१ हजाराचे बक्षीस समान विभागून दिले.

दुसऱ्या सामन्यासाठी पुणे येथील नॅशनल चँम्पीयन पल्लवी पोटफोडे व इंटरनँशनल चँम्पीयन भाग्यश्री फंड कुस्तीच्या आखाड्यात उतरले. दोघ महिला मल्लांनी पुर्ण आखाड्याचे निरीक्षण करुन सामन्यास प्रारंभ केला. दोघ मल्लांमध्ये नेत्रदिपक सामना रंगला आधून मधून अंगावर काटे आणणारे प्रसंग देखील यावेळी उभे राहिलेत जिकरीच्या झालेल्या या सामन्यात भाग्यश्री फड विजयी झाल्यात. दिवंगत दयाराम नाना सोनवणे यांच्या परिवाराने या दोघ महिलांच्या सामन्याचा प्रारंभ केला होता. तर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानाजी दळवी यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले.

बजाज सिध्दी ऑटोचे संचालक चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते आखाड्यात मथुरा येथील विनोद कुमार व हरियाना येथील रिंकु सिंग यांच्यातील कुस्तीचा सामना लावण्यात आला यात रिंकु सिंग विजयी झाले. त्यांना ५१ हजारांचे बक्षीस सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले.

पंढरपूर येथील संतोष जगताप व हरियाना येथील रोहीत कुमार यांच्यातील सामना पोलिस निरीक्षक विजय सुखदेव पवार यांच्या हस्ते लावण्यात आला. यावेळी दोघ पहिलवानांनी निकराची झुंज दिली. या सामन्यात संतोष जगताप यांनी बाजी मारली पोलिस निरीक्षक पवार यांच्या हस्ते ६१ हजारांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

आकलूज येथील सचिन केचे व पुणे येथील विक्रम वडतीले या दोघ मल्लांना आखाड्यात पाचारण करुन डि.आर ट्रेडिंग कंपनीचे संचालक दिपक गोविंद सोनवणे यांच्या हस्ते कुस्तींचा सामना लावण्यात आला. या सामन्यात विक्रम वडतीले यांचा विजय झाला त्यांना सोनवणे यांच्या हस्ते ७१ हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले.

कुस्तीच्या आखाड्यात जालणा येथील विलास डोईफोडे व कोल्हापूर येथील संतोष दोरवड यांना उतरवून कुस्तींचा सामना खेळवण्यात आला दोघ मल्ल नामवंत असल्याने दोघांमध्ये रंगलेली झुंज प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरत होती. या उत्साहातून प्रेक्षकांकडून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद कुस्तीगिरांना मिळत होता अखेर या सामन्यात संतोष दोरवड यांनी बाजी मारली त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नितीन डेंजेर सोनवणे यांनी जाहीर केलेले १ लाख रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फटाक्यांची तुफान आतिषबाजी करण्यात आली.

कुस्तांच्या सामन्यामधील सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागुन असलेल्या मल्ल सातारा येथील उपमहाराष्ट्र केसरी व दिल्ली येथील बंटी कुमार यांना पाचारण करताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने व शिट्यांच्या आवाजात स्वागत करून शुभेच्छा दिल्यात. हलगी वाद्याच्या गजरात दोघ मल्लांचे स्वागत करण्यात आले.आखाड्यात उतरुन मान्यवरांच्या हस्ते दोघ मल्लांमध्ये कुस्तीचा सामना लावण्यात आला. दोघ पहिलवानांमध्ये तब्बल ११ मिनट जिकरीची लढत झाली दोघांकडून निरनिराळे डावपेच खेळण्यात आले.

प्रेक्षकांच्या नजरा या लढतीने खेळून राहिल्यात दोघांमध्ये झालेल्या निकराच्या झुंजीत कोण विजयी होत याचा अंदाज प्रेक्षकांकडून टाळ्या व शिट्यांच्या प्रतिसादातून मल्लांना मिळत होता यामुळे दोघांमधील सामना रंगतदार नेत्रदीपक व रोमहर्षक झाला. अखेरच्या क्षणाला केसरी उपविजेते किरण भगत यांनी दिल्ली केसरी विजेते बंटी कुमार यांना चित करुन विजयाची मोहर रोवली. विजेते किरण भगत यांचे यावेळी प्रेक्षकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले, तर आखाड्याबाहेर तुफान फटाक्यांची आतिषबाजी झाल्याने परिसराला दिपावली उत्सवाचे स्वरूप आले होते.

विजेते किरण भगत यांना मानाची चांदीची गदा व १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, विजयराज वाघ, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, पोलिस निरीक्षक विजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, आयोजक माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, सरचिटणीस नितीन सोनवणे, सागर सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस देऊन भगत यांना गौरविण्यात आले.

सामन्यांचे पंच म्हणून क्रीडा शिक्षक सी.डी.सोनवणे, दिलीप देवरे, विठ्ठल बागुल,प्रकाश सोनवणे, पैलवान निलेश पाकळे, मुन्ना शेख, मंगेश खैरणार, जीवन सोनवणे, आदिंनी काम पाहिले. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ट्रिपल केसरी विजेते राज लोणारी, धुळे तालीम संघाचे अध्यक्ष गजेंद्र अंपाळकर, शेतकी संघाचे चेअरमन प्रल्हाद पाटिल, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार, मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, मविप्र संचालक डॉ. प्रशांत देवरे, माजी नगरसेवक दिनकर सोनवणे, रामुतात्या सोनवणे, दगाजी सोनवणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत भामरे आदींसह महाराष्ट्र कुस्ती मल्ल विद्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा दिवंगत दयाराम नाना सोनवणे यांचे परम मित्र कौतीक महाराज पगार यांचा यावेळी आयोजकांच्या वतीने विशेष जंगी सत्कार करण्यात आला.

कुस्ती दंगल यशस्वीतेसाठी सागर सोनवणे, दिपक सोनवणे, अनिल सोनवणे, पप्पू सोनवणे, रामा पवार, मोती लाडे, अभिषेक हेडे, परेश देवरे, राहूल शेलार, बाॅबी देवरे, गिरीश सोनवणे, निखील सोनवणे, रोहीत सोनवणे आदिंसह छोटूदादा सोनवणे व नितीन डेंजेर सोनवणे मित्र मंडळ,मल्हार रोड युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

 

सटाणा: येथिल सामाजीक कार्यकर्ते स्वर्गीय दयाराम नाना सोनवणे यांच्या आठव्या पुण्यस्मरनार्थ भव्य कुस्ती स्पर्धा पाठक मैदानावर आयोजीत करण्यात आली होती .यावेळी कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

सटाणा: येथिल सामाजीक कार्यकर्ते स्वर्गीय दयाराम नाना सोनवणे यांच्या आठव्या पुण्यस्मरनार्थ भव्य कुस्ती स्पर्धा पाठक मैदानावर आयोजीत करण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्राचा पहीलवान किरण भगत व दिल्लीचा पहीलवान बंटी कुमार यांची दीड लाख रुपयांची कुस्ती अतिशय चुरशीची झाली यात किरण भगत विजयी झाले.

सटाणा: येथिल सामाजीक कार्यकर्ते स्वर्गीय दयाराम नाना सोनवणे यांच्या आठव्या पुण्यस्मरनार्थ भव्य कुस्ती स्पर्धा पाठक मैदानावर आयोजीत करण्यात आली होती. ऐक्कावन्न हजार रुपयांची महीलांची कुस्ती भाग्यश्री फंड व पल्लवी पोटफोडे यांच्यात झाली. ही कुस्ती भाग्यश्री फंड हीने जिंकली. विजयी झाल्यानंतर भाग्यश्रीने उलटी उडी मारून आनंद साजरा केला.

सटाणा: येथिल सामाजीक कार्यकर्ते स्वर्गीय दयाराम नाना सोनवणे यांच्या आठव्या पुण्यस्मरनार्थ भव्य कुस्ती स्पर्धा पाठक मैदानावर आयोजीत करण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्राचा पहीलवान किरण भगत व दिल्लीचा पहीलवान बंटी कुमार यांची दीड लाख रुपयांची कुस्ती अतिशय चुरशीची झाली यात किरण भगत विजयी झाले. त्यांचा चांदीची गदा व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करतांना माजी नगरसेवक मनोज ( छोटू दादा ) सोनवणे,आयोजक सागर (भैय्या) सोनवणे, नितीन सोनवणे समवेत, मुन्ना कासम, श्रीपाद कायस्थ, बॉबी देवरे आदींसहकार्यकर्ते

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे कृषिदुतांनी केले जैविक खता विषयी मार्गदर्शन

मनीष शेलार सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र सटाणा(२७ नोव्हेंबर २०२२) : रासायनिक खताने जमिनीचा पोत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: