Thursday , December 8 2022
Breaking News

अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देऊन त्यात मराठी पोषण ट्रक ऍप समाविष्ट करून द्यावे या मागणीसाठी आंदोलन

विशाल आंबेकर सुराज्य न्युज महाराष्ट्र

सटाणा (१२ नोव्हेंबर २०२२)- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ बागलाण तालुक्याच्या वतीने पंचायत समिती बागलाण ते बालविकास प्रकल्प कार्यालय सटाणा येथे तालुका अध्यक्ष कुसुम खैरनार-गांगुर्डे, लता देवरे,शालिनी सावकार यांच्या नेतृत्वाखाली भव्य धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेने चे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत पाठिंबा देऊन अल्प मानधनात जास्त काम करून घेतले जाते.त्यामुळे त्यांचे कामकाज सुटसुटीत करण्यासाठी नवीन मोबाईल देण्यात यावेत या मागणी साठी पालकमंत्र्यांना भेटून प्रश्न मांडू असे अश्वसित केले.यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष वैभव गांगुर्डे व शहर अध्यक्ष यशवंत कात्रे ,दगाजी सोनवणे, राजन चौधरी,यांनी मनोगत व्यक्त करून मोर्चा ला पाठिंबा दिला.बालविकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी सचीन अहिरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या तालुका अध्यक्ष कुसुम खैरनार-गांगुर्डे, लता देवरे, मनीषा कापडणीस, रुपाली खरे, जिजा जाधव, प्रतिभा सावंत, शालिनी सावकार, इंदू बोरसे, अंजना गांगुर्डे, लता पाटील, भिकू दुसाने, ललिता सोनवणे, यशोदा पवार, छाया उशिरे, उषा पगार, विजया धोंडगे, स्मिता धोंडगे, ज्योती आहिरे, संध्या आहिरे.प्रमिला गांगुर्डे,आदीसह शेकडो सेविका मदतनीस उपस्थित होत्या.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: