Thursday , December 8 2022
Breaking News

सप्तशुंगडावर अत्याधुनिक सोईनियुक्त कार्डियाक अॅम्बूलन्स ग्रामस्थ सह भाविकांच्या सेवेत दाखल .

सप्तशुंगडावर अत्याधुनिक सोईनियुक्त कार्डियाक अॅम्बूलन्स  ग्रामस्थ सह भाविकांच्या सेवेत  दाखल .

 

स्टेट बॅक नाशिक मार्फत भेट

सी एसआर  निधीतुन

सुराज्य न्युज / तुषार बर्डे

 

सप्तशृंगीगड :- द्यस्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी मातेच्या भाविकांच्या सेवेतअत्याधुनिक सोईनियुक्त कार्डियाक अॅम्बूलन्स भाविकांच्या सेवेसाठी सज्ज.

 

आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी मातेच्या भाविकांच्या व ग्रामस्थांच्या  सेवेत आज आधुनिक पध्दतीने बनविलेली ऑम्बुलनस देण्यात आली व तिचा लोकार्पण सोहळा पार पडला

मौजे सप्तशृंगगड येथे श्री सप्तशृंग निवासिनी मार्फत चालु असलेल्या दवाखाना मध्ये  सेवा-सुविधेसह धर्मार्थ रुग्णालय व रुग्णवाहीकेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हा भाग नाशिक जिल्हयातील दुर्गम व आदिवासी बहुसंख्येने व्यापलेला असून, शैक्षणिक व आरोग्य विषयक सेवा सुविधा बाबत अद्याप अपेक्षित प्रमाणात वधारलेला नाही. पर्यायी विश्वस्त संस्थेने मौजे सप्तशृंगगड येथिल गरजवंत नागरीक / भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून नियोजन केलेले असून, भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय, नाशिक तर्फे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टला सीएसआर निधीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी कार्डियाक अॅम्ब्युलन्स अर्पण स्वरूपात दिली आहे. सदरच्या कार्डियाक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून भाविक व आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक उपचारासह रुग्णसेवा देत हॉस्पिटल पर्यंत पोहचवने शक्य होईल.

त्या दृष्टीने आज दि. १८/०३/२०२२ रोजी सदरच्या कार्डियाक अॅम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा मा. दिपनकुमार दत्ता – मुख्य न्यायमुर्ती यांच्या पत्नी सौ. जूम्मा दत्ता तसेच मा. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. . प्रसंगी  श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे  अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. वर्धन देसाई,  व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर,  जनसर्पक अधिकारी भिकन वाबळे  कर्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश जोशी,   श्री. प्रशांत निकम, , राजु पवार  आदि सह  कर्मचारी वर्ग, सप्तशृंगगड ग्रामपंचायत पदाधिकारी, भाविक आदी उपस्थित होते.

 

About चंद्रकांत आहिरे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: