Thursday , December 8 2022
Breaking News

साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे विज्ञान प्रदर्शन

सुराज्य न्युज / शरद शिंदे

 

लखमापूर :- साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इ‌.१ली ते इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला विद्यार्थ्यांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्तीक क्षमता चे प्रदर्शन करुन खुप प्रयोग दाखवले.
या प्रसंगी यशवंत नगर येथील उपसरपंच अनिल गावित , पोलिस पाटील श्रीधर बागुल तसेच प्रमुख पाहुणे डॉ.अशोक गोसावी यांनी फित कापून उद्घाटन केले.
विज्ञान प्रदर्शन ठेवण्याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थी यांची विज्ञानाप्रती जागरूकता व्हावी आणि विज्ञान ला आपल्या विषयांपैकी प्रमुख विषय समजावा असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्या सौ.रोशणी अहिरे यांनी दिलं.
ह्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विज्ञानाच्या काही गोष्टी प्रदर्शनात येणाऱ्या पाहुणे पालक तसेच अभ्यागतांना सांगितल्या.
प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विज्ञान शिक्षक प्रा.तुषार निकम,प्रा.भुषण भामरे,प्रा.शिरोळे मॅडम,प्रा.देवरे मॅडम तसेच वर्गशिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी इ.प्रयत्न केले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: