Thursday , December 8 2022
Breaking News

साई इंटरनॅशनल स्कूल & ज्यु.काॅलेज लखमापूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा.

सुराज्य न्युज /रोशन जाधव

लखमापूर :- दि.८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे झालेल्या कार्यक्रमात महिला विषयक विषयांवर शालेय विद्यार्थ्यांनींनी आपआपली मते मांडली शिक्षकांनी आपले विचार मांडतेवेळी प्राध्यापिका प्रियंका बच्छाव यांनी स्त्री विषयी बोलताना स्त्री ही फक्त मुलगी नसुन तीच्या पुजनासोबत लक्ष्मी मातेच्या सारखं तिला जिव लावला पाहिजे असे प्रखर मत यावेळी दिले. कार्यक्रमात महिला शिक्षिका यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.शशिकांत अहिरे यांचे कडुन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुषार निकम यांनी केले यावेळी प्रा.सुरेंद्र हांडे,प्रा.निलेश निकम ,प्रा.भाऊसाहेब कुंवर,प्रा.प्रकाश निकम आणि कर्मचारी उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: