Thursday , December 8 2022
Breaking News

आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र

जुनी शेमळी (१५ नोव्हेंबर २०२२)- येथील ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतीकारक स्वातंत्र सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच कल्पना शेलार यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
सागर शेलार यांनी मनोगत व्यक्त करतांना जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना एकत्र करून ब्रिटिश्यांच्या जुलमी राजवटी विरोधात लढा दिला तसेच त्यांनी जल,जंगल,जमीन व सांस्कृतिक परिवर्तन या दुहेरी आव्हानाविरुद्ध केलेला संघर्ष नेहमी प्रेरणा देत राहील असे सांगितले. तसेच मा. उपसरपंच रमेश निकम यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली.यावेळी सरपंच कल्पना शेलार,सदस्य रोशन पवार,अनिल गायकवाड,जनार्धन शेलार,सागर शेलार,संजय गांगुर्डे,तंटामुक्ती अध्यक्ष श्रीराम वाघ,ग्रामसेवक चेतन काथेपुरी,संजय पवार,राजेंद्र बच्छाव,पिंटू पवार,विलास निकम,बाप्पू अहिरे,प्रताप निकम,किरण निकम,दीपक पवार,रोशन निकम,विनोद निकम,संजय अहिरे व आदिवासी युवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: