Thursday , December 8 2022
Breaking News

समृध्दी महामार्गामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांन बरोबर खा.श्री.हेमंत गोडसे यांनी साधला संवाद

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र

बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२) नाशिक चे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी धामणी गावातील शेतकरी समृद्धी महामार्गामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून स्वतः खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. शेतकर्यांची अडचण तात्काळ दुर करण्यासाठी तहसीलदार कासाळू साहेब व रेडी साहेब व तलाठी कडनोर साहेब तसेच तालुकाप्रमुख संपतराव काळे, समाधान भाऊ वारूंगसे, राजेंद्र भोसले, उत्तम भाऊ भोसले, तसेच सर्व गावकरी धामणी यांनी खासदार श्री. हेमंत आप्पा गोडसे व गावातील शेतकऱ्यांनच्या समस्या दूर करण्यासाठी सांगितले. तसेच घरांची भरपाई देण्याचे ठरविले आहेत. बागायत असलेल्या पिकांची भरपाई, पईप लाईन दुरूस्ती, रस्ते दुरूस्त करण्यासाठी सांगितले. वहिवाट रस्ता १५ दिवसात पुर्ण करण्यात सांगितला . ब्लास्टिंग करण्यासाठी मंजूरी ६.०० वाजेनंतर करण्यास सांगितले. सर्व शेतकऱ्यांनचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी तात्काळ १५ दिवसात शेतकऱ्यांनच्या अडचणी सोडविण्यास सांगितल्या.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: