Sunday , November 27 2022
Breaking News

जुनी शेमळी येथे कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न

मनीष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्यूज महाराष्ट्र

जुनी शेमळी- (११ नोव्हेंबर २०२२) – तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार( दि ११) तालुक्यातील जुनी शेमळी येथील ग्रामपंचायत कार्यालायात कायदेविषयक प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सटाणा न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी ऐ अहिरे शिबिराच्या अध्यक्षस्थानी होत्या. न्यायाधीश पी ऐ अहिरे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करतांना आपला वाद हा न्यायालयामध्ये न दाखल करता लोकन्यायालाय मार्फत सोडवला तर आपला वेळ ,पैसा,श्रम वाचू शकतात व परस्परातील वाद सर्व संमतीने सोडवू शकतो असे सांगितले.व्यासपीठावर अड दर्शना मोटवानी सरपंच कल्पना शेलार उपसरपंच संदीप बच्छाव ,रोशन पवार,अनिल गायकवाड,वैशाली शेलार,सुनंदा गांगुर्डे,सुवर्णा बच्छाव,पूजा बागुल जनार्धन शेलार,सागर शेलार,नितीन बागुल,तंटामुक्ती अध्यक्ष श्रीराम वाघ,वसंत बच्छाव,साखरचंद बच्छाव ,ज्ञानेश्वर शेलार,विस्तार अधिकारी नितीन देशमुख ग्रामसेवक चेतन काथेपुरी,सार्थक कुलकर्णी,हर्षल पंचभाई व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी व आभार सागर शेलार यांनी मानले.

 

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: