Thursday , December 8 2022
Breaking News

निलज-कारधा रस्ता पूर्णत्वासाठी कांग्रेसचा गडकरींना काळे झेंडे दाखविण्याचा डाव फसला

सुराज्य न्युज/ रुपाली मेश्राम

भंडारा:- पवनी तालुक्यातील निलज-पवनी रास्ता बांधकामाच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भंडारा अगमनाप्रसंगी कांग्रेस पक्षातर्फे काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई सहित कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याने आंदोलनाचा डाव फसला. सदर प्रकार गांधी भवन पवनी येथे घडला.
प्राप्त माहितीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी गुरुवारी विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी येणार असल्याचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टीतर्फे निलज-कारधा मार्गावरील पहेला गावी काळे झेंडे दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांचा जमाव गांधी भवन पवनी येथे झाला असतांना गोपनीय माहितीच्या आधारे पवनी पोलिसांनी मोहन पंचभाई व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. दरम्यान मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात नितीन गडकरी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्यात. मागील तीन वर्षांपासून निलज कारधा महामार्गाचे काम केंद्रीय बांधकाम कंपनी अंतर्गत करण्यात येत असून अत्यंत मंदगती व निकृष्ट दर्जाचे आहे. जागोजागी रस्ता तोडफोड केल्याने अनेकांना जीवाशी खेळावे लागले. काहींचे अपघात होऊन इहलोकांची यात्रा करावी लागली. संबंधित यंत्रणेच्या विरोधात कांग्रेसने रास्ता रोको, जेल भरो तसेच वेळोवेळी निवेदने देऊनही केंद्र सरकारने नजरबंद केली आहे. महामार्गालगत असलेल्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले असून गावाचे पोचमार्ग मातीत मिसळले आहेत. याकडे केंद्र शासनाचे विशेषतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे भंडारा येथे अगमनाप्रसंगी लक्ष वेधण्यासाठी पहेला येथे काळे झेंडे दाखविण्याचा डाव आखण्यात आला. मात्र केंद्राच्या दबावाखाली येऊन पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपले असल्याचा आरोप देखील कांग्रेसतर्फे करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासोबत राजू भुरे, अशोक पारधी, चंदू कावळे, भगवान नवघरे, धर्मेंद्र नंदरधने, शंकर तेलमासरे, गजानन घावळे, सदानंद धारगावे, महेश नान्हे, मनोहर मेश्राम, राकेश बिसने, अनिकेत गभने, चेतन हेडाऊ, विपीन बोरकर, माधुरी तलमले, वंदना नंदगवली इत्यादी उपस्थित होते.
यावेळी एपीआय प्रवीण हारगुडे, खुपिया बाळा गजभिये, विनोद आरीकर यांनी पोलीस ताफ्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: