Thursday , December 8 2022
Breaking News

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र

नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांच्या बद्दल गलिच्छ भाषेत बोलणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार च्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस निफाड तालुक्याच्या वतीने पिंपळगाव टोल नाक्यावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्या प्रकारे गलिच्छ वक्तव्य ते ही एखाद्या महिलेबद्दल करते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापर आहे. ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसणार आहे. अब्दुल सत्तार चा माज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उतरवल्या शिवाय शांत बसणार नाहीत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ,युवक तालुकाध्यक्ष भुषण शिंदे,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, नवाझ काझी,चंद्रकांत विधाते,श्रीकांत वाघ,तालुका उपाध्यक्ष राहुल ढोमसे,गोकुळ झालटे,रोहन होळकर अमित धारराव, भावेश मंडलिक,सद्दाम पिंजारी,कृष्णा शेजवळ,अमोल दाते,देविदास टरले ,प्रणय निकम लक्ष्मण गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे,अंबादास जाधव,अमोल संधान,अजय चोरडिया,ओमकार वाघ,संकेत जाधव,केतन गांगुर्डे, राकेश निकावडे,विशाल भडके, किरण शेळके विष्णू मोगल, करण बनकर व आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: