Thursday , December 8 2022
Breaking News

नांदुर-शिंगोटे येथील आठवडी बाजार चालला रस्त्यावर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष

सुराज्य न्युज/ प्रकाश शेळके
सिन्नरः सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नांदुर-शिंगोटे गावाचे नाव पुढे आहे गाव सदरचे गाव नाशिक-पुणे महामार्गावर असल्याकारणाने आसपासच्या दहा ते पंधरा गावांचा संपर्क ह्या गावाशी होत असतो सदरच्या गावांमध्ये सर्व सुविधा आहे बँका पतसंस्था महावितरण कार्यालय कृषी विभाग कार्यालय तलाठी कार्यालय वन विभाग कार्यालय पोस्ट ऑफिस दवाखाने अशा एक ना अनेक सुविधांनी हे गाव परिपूर्ण आहे सदरच्या गावासाठी दर शुक्रवारी आठवडी बाजार भरला जातो सदरच्या बाजारासाठी मोठ्याप्रमाणावर ग्रामपंचायत प्रशासनाची भव्यदिव्य जागा आहे मात्र गेल्या अनेक दिवसापासून सदरचा बाजार हा नाशिक-पुणे मार्गावर रस्त्यावर भरला जात आहे सदरच्या रस्त्याकडे पीडब्ल्यूडी खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष आहे गावाच्या बाहेरून बायपास गेल्यामुळे पीडब्ल्यूडी खात्याकडे हा रस्ता वर्ग असूनही याकडे ते लक्ष देत नाही त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर ती या रस्त्यावर दुकानदार आपली दुकाने थाटामाटात लावत असून यामधूनच वाहनधारकांना आपल्या वाहनासाठी रांगा लावाव्या लागतात त्याचप्रमाणे शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर ती शेतकरी बोलतोय या ठिकाणी आपला कांदा विक्रीसाठी आणत असतात त्यामुळे सर्वच वाहनांना या दुकानदाराने मुळे मोठ्या प्रमाणावर ती अडथळा निर्माण होत आहे वेळोवेळी दुकानदारांना सांगूनही दुकानदार ऐकत नाही मात्र ग्रामपंचायत प्रशासन वेळोवेळी आपला पर्याय देत असूनही त्याकडे हे दुकानदार दुर्लक्ष करीत आहे तेव्हा त्या रस्त्यावर भरणारा बाजार व त्या भर आलेल्या बाजारावर एखाद्या दिवशी जर एखाद्या वाहनाने आपला मोर्चा वळविला तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर ती एखादी दुर्घटना घडल्या शिवाय राहणार नाही तेव्हा पीडब्ल्यूडी खात्याने त्वरित या बाजाराचा बंदोबस्त करावा व सदरच्या रस्त्यावर ती दुकाने मान्य दुकानदारांना मज्जाव करावा अन्यथा एक दिवस मोठ्या प्रमाणावर ती अपघात घडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा याकडे त्वरित लक्ष घालून या ठिकाणचा बाजार हटवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

About जगन जाधव

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: