Thursday , December 8 2022
Breaking News

नागपूर विद्यापीठात प्रकुलगुरूंच्या हस्ते सन्मानित

सुराज्य न्युज/ रुपाली मेश्राम

लाखणी:-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील बी. एसी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त निमित्त प्रयोग स्पर्धेत आर्य सिंगनजुडे कोलाज प्लास्टिक कचरा आणि कृषी, आर्य वालोडे ई-कचऱ्याचा पुनर्वापर, मारिया बकाली टाकाऊ कागदापासून बनवलेली कलाकृती, कल्याणी पचारे प्लॅस्टिक आणि शेलपासून बनविलेले आर्टिफकॅट, पूजा सोनवणे घरातील रोपाने हिरवे व्हा असे प्रयोग प्रदर्शित केले होते. यावेळी कोलाज प्लास्टिक कचरा आणि कृषी आर्य सिंगनजुडे या विद्यार्थिनीचा प्रयोग प्रोत्साहनपर बक्षिसासाठी निवड करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ संजय दुधे यांच्या हस्ते आर्य सिंगनजुडे या विद्यार्थिनीचा प्रशिस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या सर्व विद्यार्थिनींना सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रतिमा आर यादव आणि प्रेरणा चाचेरे यांचे मार्गदर्शन लाभले. या बाबद संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ बी. परवते, डॉ सचिन रहांगडाले, डॉ मंगेश वंजारी, प्रा पूजा नवखरे, प्रा गीता तरोणे, प्रा अजिंक्य भांडारकर, प्रा संदीप डोंगरे, डॉ धनंजय गभने, लालचंद मेश्राम, सौ सुनंदा रामटेके, डॉ सु बंस्पाल, सौ अनिता दाणी, डॉ बंडू चौधरी, डॉ सौ संगीता हाडगे, प्रा बाळकृष्ण रामटेके, प्रा रा कोटांगले, धनंजय गिऱ्हेपूंजे आदी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्या बाबत आवाहन

 मालेगाव शहर प्रतिनधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२७ नोव्हेंबर २०२२): अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: