Saturday , December 3 2022
Breaking News

राष्ट्रव्यापी गहन जागरूकता अभियानतर्गत बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन

मनिष ज्ञानेश्वर शेलार सुराज्य न्युज महाराष्ट्र

ब्राम्हणगाव – (दि.०३ नोव्हेंबर २०२२) – येथील हेरंब गणपती मंदिरात राष्ट्रव्यापी गहन जागरूकता अभियानतंर्गत बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात बँक मित्रचे प्रमुख विजेंद्र पगारे यांनी उपस्थित महिला बचत गटांच्या महिलांना नेटबॅकिंग व्यवहार करतांना घ्यावयाची काळजी, व खबरदारी बाबत माहिती दिली, त्यानंतर पंतप्रधान जिवनज्योती योजना, पंतप्रधान अपघाती सुरक्षा योजना, तसेच अटल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य बरोबरच फायदे बाबत मार्गदर्शन करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात बँक ऑफ बडोदा शाखेचे शाखाधिकारी राहुल देवरे, बँकेचे समाधान पवार, किरण जाधव, सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापुराज खरे, पोलीस पाटील मालपाणी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच किरण अहिरे यांनी नेटबँकिंग व्यवहार करतांना ज्या बँकेचे खाते आहे, त्या बँकेचेच अँप डाउनलोड करूनच नेटबँकिंग व्यवहार करावा असे सांगितले, तसेच उपसरपंच बापुराज खरे यांनी अनेकदा मोबाईल वर येणारे निनावी फोनमुळे आपले खाते नंबर व पिन विचारून आपल्या पैशाची फसवणूक होते म्हणून निनावी फोन आल्यानंतर आपला खाते नंबरसह एटीएमचा पिन नंबर देऊ नये असे सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती उमेदचे प्रभाग समन्वयक अशोक पिंगट, गावांतील बचत गटांचे प्रमुख तनया शिरोडे, जयश्री शिरोडे, माया वाघ, कल्याणी शिरसाठ, आशा अहिरे, भावना सोनवणे,बँक ऑफ बडोदाचे बँक मित्र महेश शिरोडे, जगदिश बागुल, रोहित भामरे, सुनील ढूमसे, रोहित भामरे व बचत गटांच्या सर्व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे कृषिदुतांनी केले जैविक खता विषयी मार्गदर्शन

मनीष शेलार सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र सटाणा(२७ नोव्हेंबर २०२२) : रासायनिक खताने जमिनीचा पोत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: