Saturday , December 3 2022
Breaking News

मे. कोर्टाच्या वारस दाखल्याशिवाय वारसांची नोंद न करणेबाबत, धरणगांव वकील संघाचे निवेदन

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव

जळगाव ( ०७ नोव्हेंबर २०२२)-
धरणगांव वकील संघामार्फत, धरणगांव तहसिलदार साो. यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील विषय म्हणजे “मयत व्यक्तीचे कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी वारसदार हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे गेल्यावर ते परस्पर केवळ एखाद्या रु. १००/- च्या स्टॅम्पवर लिहीलेला मजकुर असा दस्त स्विकारुन वारसांची नोंद करुन घेत असतात, तसेच मा. तहसिलदार सारे. यांचे रु.१००/- च्या स्टॅम्पवर शपथपत्र असलेला मजकुर स्विकारुन नोंद करून घेत असतात.” परंतु, अशी मयत व्यक्तीची नोंद करणे बेकायदेशीर आहे कारण, बॉम्बे रेग्युलेशन अॅक्ट १८२७ अन्वये वारसांची नोंद करण्यासाठी मे. न्यायालयाकडून वारस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार मे. न्यायालयातुन वारस प्रमाणपत्र (वारस दाखला) घेतल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वारस प्रमाणपत्रावरुन नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच मे. न्यायालयाव्यतिरिक्त इतर कोणासही वारस प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मे. न्यायालयाच्या आदेशाचा असलेला वारस प्रमाणपत्र नसल्यास मयत व्यक्तीच्या वारसांची नोंद करण्यात येवू नये. परंतु वारस प्रमाणपत्र नसल्यावरही परस्पर रु. १००/- स्टॅम्पवर असलेला मजकुर स्विकारुन नोंदी केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे वारसावारसांमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या वाद निर्माण होतात. या बेकायदेशीर प्रक्रियेस आळा घालण्यास धरणगांव वकील संघातर्फे आजरोजी धरणगांव तहसिलदार साो. यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन तहसिलदार यांचे वतीने नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते साो. यांनी स्विकारले. निवेदन देतांना धरणगांव वकील संघाचे अध्यक्ष अँड. आर. एस. पाटील, उपाध्यक्ष कैलास मराठे, सचिव अँड. गजानन पाटील, वकील संघाचे जेष्ठ सदस्य व सदरचा विषय गांभीर्याने घेणारे अँड. व्ही. एस. भोलाणे, अँड. राहूल पारेख, अँड. बी. के. आवारे, अँड. सी.झेड. कटयारे, अँड. मनोज दवे, अँड. आसीफ कादरी, अँड. इजराइल युसूफ, अँड. रामभाऊ शिंदे, अँड. संदीप सुतारे, अँड. संदीप पाटील, अँड. एकनाथ पाटील, धरणगांव वकील संघाचे सहसचिव अँड. प्रशांत क्षत्रिय असे सर्वांनी निवेदन दिले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: