Sunday , November 27 2022
Breaking News

प्रा.मंगल सांगळे यांचे राजापूर महाविद्यालयात व्याख्यान

सुराज्य न्युज / सुरेश सांगळे

संगमनेर :- संगमनेर तालुक्यातील नूतन कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयित्री व लेखिका प्रा.मंगल सांगळे यांचे मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अपेक्षा ठेवत असताना आपण तिचा आदर , सन्मान आधी करायला हवा आणि आईसमान मातृभाषेला जपलं तरच मराठी भाषेला आपण न्याय देऊ शकतो असे प्रतिपादन प्रा.मंगल सांगळे यांनी केले.तसेच मराठी विषय घेऊन पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या व्यवसायिक संधींबद्दल देखील त्या यावेळी बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.पी.हासे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदशन केले.
प्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ मंगल हांडे , प्रा.जयश्री चव्हाण आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन खेमनर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉमर्स विभाग प्रमुख बोर्डे सर यांनी केले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

आनंदाचा शिदा या सरकारी योजनेपासून कणकोरी गावचे काही गरीब कुटुंब वंचित , सरपंच शिवानी माळवे यांनी केला खेद व्यक्त

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण. सिन्नर-(११ नोव्हेंबर २०२२ )- कणकोरी- मी शिवानी दिलीप माळवे, सरपंच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: