Thursday , December 8 2022
Breaking News

सलग पाचव्यांदा नेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्राध्यापक मंगल सांगळे यांचा सत्कार..

सुराज्य न्युज /मंगल सांगळे 

सिन्नर (बारागांव पिंप्री):- कला व वाणिज्य महाविद्यालय बारागाव पिंप्री येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असणाऱ्या कवयित्री व लेखिका प्रा.मंगल सांगळे या शिक्षण क्षेत्रातील अवघड समजली जाणारी नेट परीक्षा मराठी विषयात एकदा नव्हे तर चक्क पाचव्यांदा उत्तीर्ण झाल्या आहेत. यापूर्वी त्या सेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाल्या असून अशाप्रकारे एकाच विषयात सलग पाच वेळेस नेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव ठरल्या आहेत.
त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एल.फरताळे यांनी आज त्यांचा सत्कार करून त्यांनी मिळविलेले यश अभूतपूर्व असून आपल्या महाविद्यालयासाठी ही खूप अभिमानाची बाब असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
प्रा.मंगल सांगळे यांनी पत्रकारितेच्या कोर्ससोबतच त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन एडिटिंग मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलेले असून नुकताच त्यांचा भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानही करण्यात आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नर येथील त्या कोषाध्यक्ष असून सध्या त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच. डी. करत आहेत.
ग्रामीण भागातून अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी अभूतपूर्व यशाला गवसणी घातल्याने त्यांचे साहित्यिक क्षेत्रासोबतच इतर सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: