Thursday , December 8 2022
Breaking News

मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे राजपाल मा.श्री. कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र     

मालेगाव (२१ नोव्हेंबर २०२२) :    मालेगाव  तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्याचे राजपाल मा.श्री. भगतसिंग कोशारी व भाजपाचे प्रवक्ते सुधाशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल आक्षेपार्हत विधान केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध व  दोघांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मोसम पुल येथिल  गांधी पुतळ्या समोर दहन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.श्री. संदीप पवार ,डॉ जयंत पवार ,महाराष्ट्र राज्य सचिव दिनेश ठाकरे ,प्रकाश  वाघ,शाबान तांबोळी,भाऊसाहेब पवार ,राजेंद्र पवार, मनमोहन शेवाळे ,अनंत भोसले, योगेश बागुल ,डॉ धिरेंद्र चव्हाण ,अशोक निकम ,वैशाली मोरे सतीष पवार ,किशोर इंगळे,प्रशांत महाजन,सलीम रिजवी, बंडू वाणी,चंद्रकांत आहिरे इत्यादी राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .पुतळा दहना प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य युवक सचिव दिनेश ठाकरे यांनी कोश्यारी व त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करीत, भाजप व त्याचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रच्या महापुरुषा बद्धल अवमान करतात. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व महापुरुष आहेत. त्याच्या बद्धल जे राज्यपाल व प्रवक्ता यांनी जे आक्षेपार्हत शब्द वापरले  हे  राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही .म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करीत आहोत.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: