Thursday , December 8 2022
Breaking News

मालेगाव महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य

मालेगांव( ९ नोव्हेंबर२०२२) – राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी आमदार व माजी महापौर शेख रशीद शेख शफी साहेब यांनी मालेगाव महानगर पालिकेच्या जाचक घर पट्टी विरुद्ध मालेगाव महानगर पालिकेच्या मा . आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढला होता. मोर्चात हजारो स्त्री पुरुष सामील झाले होते . ए. टी. टी .हायस्कुल पासून मोर्चा काढून महानगरपालिकेत शांततेने मोर्चा काढला गेला. महानगर पालिकेच्या बाहेर मोर्चेकर्यांना शेख रशीद साहेबांनी घरपट्टी विषयी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने सर्व महानगर पालिकेने जनतेवर जाचक लावण्यात आलेली घर पट्टी सरसकट लागू केली. ६०० रु घरपट्टी १ एप्रिल पासून लागू होणार आहे. त्याच्या अगोदरच ही जाचक घर पट्टी कमी करण्यात यावी. महानगर पालिकेची मुदत जून महिन्यांतच संपली आहे. प्रशासक आहे. महापालिकेत प्रशासकीय कारभार चालू आहे. प्रशासकांनी जाचक कर घरपट्टीचा लागू केली. या संदर्भात आयुक्त मा. साहेबांना निवेदन देण्यात आले . घर पट्टी कमी करावी , घर पट्टी कमी नाही झाली तर आजच्या मोर्चाच्या पेक्षा ज्यास्त संख्येने जनता येईल व धरणे आंदोलन केले जाईल. याची नोंद आयुक्त साहेबांनी घ्यावी. सरकार पर्यंत आमचे निवेदन पोहचवावे. मोर्चाच्या वेळी कॉंग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. माजी महापौर श्रीमती ताहेरा मॅडम यांनीही आपले मनोगत जाचक घरपट्टी विषयी व्यक्त केले. जे लोक मोकळ्या जागेवर राहतात ज्यांना घरे नाहीत त्यांच्यावर ही १२००तर कोणावर ८०० अशाप्रकारे जाचक घर पट्टी लागू करण्यात आलेली आहे. जे लोक मोकळ्या जागेवर घरे बांधून राहतात .त्यांनी घर पट्टीचे कागद पत्र शेख रशीद साहेबांना दाखवले . विनंती केली की, साहेबांनी शासना कडे तक्रार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. मालेगावात मजुरी करणारे व हात मजूर लोक मोठ्याप्रमाणात आहेत असेही माजी आमदार व माजी महापौर यांनी सांगितले महापालिकेचे आयुक्त मनमानी कारभार करीत आहेत .ते महापालिकेत नेहमी गैरहजर राहतात त्यामुळे न्याय कोणा कडे मागावा. त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आला. आता तरी प्रशासक साहेबांना जाग येईल व जनतेचे कामे करतील असे शेख रशीद साहेब म्हणाले , मोर्चाची नंतर सांगता झाली.

ह्या मोर्चाच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र युवक अध्यक्ष दिनेश ठाकरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते धर्मा भामरे , अनंत भोसले, नंदू सावंत, माजी नगरसेवक सुलतान मेंबर, इमरान मेंबर ,मोसिंन मेंबर, व अल्पसंख्याक सेल चे अब्दुल सत्तार व पदाधिकारी हजर होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: