Thursday , December 8 2022
Breaking News

माजी विद्यार्थी संघटना मेळावा उत्साहात संपन्न

सुराज्य न्युज / अमोल बच्छाव

मालेगाव :- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा नुकताच संपन्न झाला.
यावेळी सुरवातीलाच शिक्षण व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्हि. एस. मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे, अँड विनोद चव्हाण, के. एन अहिरे, शेखर पवार, दादाजी वाघ, सतिष कलंत्री आदि मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बॉल बॅडमिंटनचे विद्यापीठ खेळाडू प्रा.नरेंद्र निकम( शारीरिक शिक्षण संचालक, ताहाराबाद महाविद्यालय) यांनी आपल्या मनोगतातुन या वर्षापासून महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचा दरवर्षाचा उत्कृष्ट खेळाडूला दरवर्षी 3001/- रूपये व ट्रॉफी जाहीर केली. व ही मदत अजीवन सुरू राहील असे सांगितले .
यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे यांनी आपल्या मनोगतात उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी जोडून घेऊन अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे, तसेच महाविद्यालयाची नाळ कायम ठेवली पाहिजे असे सांगितले. महाविद्यालय नेहमीच माजी विद्यार्थ्यांसोबत आहे, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे यांनी आपल्या मनोगतात माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अनेक आर्थिक दुर्बल घटकांचे विद्यार्थ्यांचे पालकत्व माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वीकारण्यात आले आहे, असेही सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सी.एम. निकम, शैक्षणिक समन्वयक डॉ. एन.बी. बच्छाव, कुलसचिव रघुनाथ शेलार, कार्यालयीन अधीक्षक जयवंत कट्यारे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कलंत्री यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. राहुल देसले व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. अतुल वाघ यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: