Thursday , December 8 2022
Breaking News

धोडंबे येथे गोरक्षनाथ स्कूल मध्ये वृक्ष लागवड करून केला महिला दिन साजरा

सुराज्य न्युज / अमोल बच्छाव

मालेगाव:-8 मार्च हा जागतिक
महिला दिवस म्हणून संपुर्ण जगभरात साजरा केला जातो. महिलाचा सन्मानान केला जातो. काहितरी वेगळे कराव्या या हेतुने गोरक्षनाथ स्कूल मध्ये वृक्ष लागवड महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मा.श्रीमती पी.आर साळवे(वनरक्षक वडाळीभोई) पर्यावरण संवर्धन करण्याचे आव्हान केले. मा. श्रीमती डाॅ. ऋतुजा बनकर (CHO) धोडंबे यांनी आरोग्या संदर्भात मार्गदर्शन केले. मा .श्री.डि.टी. चौधरी (वनपरिमंडळ अधिकारी वडनेर भैरव) यांनी महिलांना त्याच्या जीवनात कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते यावर महिलाना संबोधित केले.सास्कृतीक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्याचा बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास उपस्थित मान्यवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री डाॅ. सतिष शिवाजीराव साळुके, प्रशासकीय अधिकारी श्रीमंत अनिता चौधरी, आरोग्य सेविका श्रीमती. कुसुम गायकवाड, वनरक्षक वडबारे श्रीमती. एस.एस.यादव,वनरक्षक नादुरटेक श्रीमती एम एस वाघ, वनसेवक श्री आशोक शिंदे,शालेय कमिटी सदस्या श्रीमती चित्रा विजय रकिबे, मुख्याध्यापक मा.श्री प्रशांत परदेशी, श्री रविद्र जगताप,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.अमोल बच्छाव यांनी केले. व आभार प्रदर्शन मा.रोशन परदेशी यांनी केले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: