Saturday , November 26 2022
Breaking News

महाविकास आघाडी सरकाराचा निषेध करण्यात आला…

सुराज्य न्युज /सटाणा प्रतिनधी

सटाणा:- थकीत वीजबिलापोटी राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीज बेधडकपणे खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे,राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असतानाच शेतकऱ्याची वीज खंडित केल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे, शेतीपंपांची अवास्तव बिल आकारणी, लाखो रुपयांची थकबाकीची बिले देऊन सक्तीच्या वीज बिल वसुलीने बळीराजाचा अडचणीत येत आहे.

या संदर्भात विरोधी पक्ष नेते माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस व आमदार दिलीप बोरसे साहेब तसेच भारतीय जनता पार्टीच्या इतर विधानमंडळ सदस्यांनी आज सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली परंतु शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम थांबविण्याबाबत व शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिला संदर्भात कुठलाही ठोस उपाय, दिलासा न देणाऱ्या जुलमी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात, विधानभवन परिसरात निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

 

 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ऍड

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: