Saturday , December 3 2022
Breaking News

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे बाल दिवस उत्साहात साजरा

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगाव सुराज्य न्युज महाराष्ट्र

धरणगांव – (१४ नोव्हेंबर२०२२)- धरणगाव येथील स्थानीय महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार सर होते.
शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार पर्यवेक्षक एम.बी.मोरे यांच्या शुभहस्ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांनी पंडित जवाहलाल नेहरू यांचे जीवन कार्य विशद करून बाल दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एच.डी.माळी यांनी तर आभार पी.डी. पाटील यांनी मानले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: