Thursday , December 8 2022
Breaking News

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र आणी प्राणीशास्त्र विभागाच्या मार्फत आयोजित एक दिवसीय इंटरनॅशनल सेमिनार

सुराज्य न्युज / मॄगनयन उशिरे

अजंग :- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र आणी प्राणीशास्त्र विभागाच्या मार्फत आयोजित एक दिवसीय इंटरनॅशनल सेमिनार इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेच्या मार्फत वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले.
जैविक विज्ञानात असलेल्या शिक्षण, संशोधन आणि नोकरी या विषयी आणि CSIR NET, ICMAR NET, ICAR NET, DBT, BARC, GATE, SET अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांविषयी श्रीमान लालजी कानोजिया यांनी विसृत असे मार्गदर्शन पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. एफ. शिरुडे होते. उद्घाटनपर भाषण वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जे. टी. जाधव यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परीचय प्रा. झिया हुसेन यांनी केला तर सूत्रसंचालन अतुल वाघ व आभार प्रदर्शन प्रवीण निकम यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वाय. सी. शास्त्री, डॉ. जे.डी. वसईत, प्रा. गुलाब पवार, डॉ. ए.के. सोनावणे डॉ. प्रवीण पाटील, डॉ. कपिल पाटील, प्रा. झरका सरावत, प्रा. प्रतीक्षा पवार, प्रा. श्रद्धा पाठक यांनी परिश्रम घेतले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: