Saturday , December 3 2022
Breaking News

कृषी महाविद्यालयात हक्क हमारा भी तो हे, कायदेविषयक शिबिर संपन्न

मनिष शेलार (बागलाण) सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र 

मालेगाव (५ नोव्हेंबर २०२२) ७५ स्वतंत्र्य अमृत महोत्सव प्रसंगीं काष्टी मालेगाव कॅम्प येथील शासकीय शेतकी महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर तालुका विधी सेवा समिती मालेगाव न्यायालय व मालेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका विधी सेवा समितीचे आध्यक्ष मा. श्री. शा.भा.बहाळकर साहेब न्यायाधीश १ यांच्या मार्गदर्शनाखाली “हक हमारा भी हे, ७५ व्या विधि सेवा कायदेविषयक साक्षरता अभियान” कार्यक्रमाचे आयोजन दि.०४/११/२०२२ रोजी करण्यात आले.या कार्यक्रमचे आयोजन मा.श्री.शा.भा.बहाळकर जिल्हा न्यायाधीश-१, व अप्पर .सत्र न्यायाधीश, मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्तविक ॲड श्री. पवन जाधव यांनी केली. सदर शिबीराप्रसंगी मा.श्री. उ. बी. श्रीराम साहेब सह दिवाणी न्यायाधीश मालेगाव यांनी कायदे यासंबंधी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी संरक्षण करण्यासाठी वापरात येणाऱ्या कायदे कलमांची माहिती दिली. भारतीय सविधान मधील राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिपेक्षता यांचे विषयी कायदेची मदत कशी करता येईल, या विषयावर साहेबांनी , कायदेविषयक सोशल मीडियाचा मुळे वाढते गुन्हे व विशाखा समिती कार्य, उद्देश मदत या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. वकील संघाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कौटुंबिक हिंसाचार वर संरक्षण,कायदे,या बद्दल माहिती दिली. कार्यक्रम सूत्र संचालन कृषी अधिकारी व्यवहारे साहेब यांनी केले.तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे सर यांनी केले. मा.श्री.एन आर भळगट साहेब सह. दिवाणी न्यायाधीश मालेगाव,. त्यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. तसेच शिबिर नियोजन श्री. श्री.सिरीन मेश्राम,श्री.रुपेश बधान .श्री. योगेश नेमणार न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

मालेगाव महानगरपालिकेचे खुले भूखंड गेले कुठे ?

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र   मुस्लिम उन्नती सेवा फाउंडेशन धुळे मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: