Thursday , December 8 2022
Breaking News

हदगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु

यंत्रणेचे दुर्लक्ष : दारू, गुटख्याची खुलेआम विक्री; कठोर कारवाईची गरज

कृष्णा चौतमाल तालुका प्रतिनिधी हदगांव जि नांदेड

हदगांव(२ नोव्हेंबर २०२२) : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह गावागावात खुलेआम दारू, गुटख्याची विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे तालुक्यात अपवादानेच बेकायदा धंदे सुरू असल्याचे दिसून येत होते. मात्र वर्षभरापासून तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे. हदगाव शहरासह तालुका भरात बेकायदेशिर धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे. हदगांव शहरातील काही टपऱ्यांवर खुलेआमपणे दारूची विक्री होत आहे. शहराबरोबर शुभाष सुगर कारखान्याच्या पुढे एका धाब्यावर मटका , निवघा शहरात दारु , जुगार , मटका, गुटखा खुलेआम मोठ्या प्रमाणावर चालतो. तसेच निवघा परिसरात प्रामुख्याने कोळी येथे मोठ्या प्रमाणात खुलेआम मटका चालतो. इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवर देखील खुलेआम पणे बेकायदा दारूची विक्री होत आहे. काही गावात बेकायदा दारू विक्रेत्यांनीही हदगांव शहरात चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे. बेकायदा दारू विक्रीबरोबरच तालुक्यात गुटखा, पेट्रोलचीही बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. अनेक गावांत काही पानटपऱ्या,दुकानांतून पेट्रोल, गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू, पेट्रोल आणि गुटख्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत. दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरु असताना कारवाई झाल्याचे चित्र कोठेचे दिसून येत नाही. संबंधित गावची जबाबदारी असणाऱ्या बीट अंमलदारांना, बेकायदा धंद्यांची माहिती असूनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पोलिस विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील अवैद्य धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याने चित्र आहे. एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरात अवैध व्यवसाय जोमात असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: