Thursday , December 8 2022
Breaking News

भुमीहीन गायरान जमीन धारकांसाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे रमाताई भालेराव यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपूर तहसीलदार कार्यालया समोर आंदोलन

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

मालेगाव (२१ नोव्हेंबर २०२२) : महाराष्ट्रातील दलीत आदीवासी गायरान धारक गेल्या १०० वर्षांपासून भुमीहीन असून त्यांनी आपापल्या गावी जमिनीत घरकुल झोपडी बांधुन राहात असुन राज्य शासन या नागरीकांना बेघर करत असुन त्याविरुद्ध अन्याय अत्याचार निर्मुलन समिती च्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ.रमाताई भालेराव यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपूर तहसीलदार कार्यालया समोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे
दलीत आदीवासी भुमीहीन बेघर असलेल्या नागरिकांनी नापीक व जेथे काही पक्के होत नाहीत अशा पंडीत दरयाखोरयातील जमीनीवर घरे बांधून काहीनी जमीन करण्याच्या दृष्टिने सदर जमीनी ताब्यात घेतल्या. राज्य व केंद्र सरकार हे अशा आदीवासी दलीत बांधवांना बेघर करु पहात असुन तश्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. या विरुद्ध अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे स्वरुपाचे जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती समितीचे पदाधिकारी नगर जिल्हाध्यक्ष डाॅ.नरेंद्रकुमार गोडगे, जिल्हा कायदेशीर सल्लागार एँड.बाबासाहेब पाठक, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण कदम यांनी दीली आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: